vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिशा सालियन प्रकरणात उभाठा नेत्यांबाबत भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रेस वार्ता काय म्हणाले ते…

दिशा सालियन प्रकरणात उभाठा नेत्यांबाबत भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रेस वार्ता काय म्हणाले ते…

 

मुंबई प्रतिनिधी –

दिशा सालीन प्रकरणात उभाठा नेत्यांबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रेस वार्ता काय म्हणाले ते.. पत्रकार परिषद घेत दिशा सालियन प्रकरणासह इतर अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रया दिली. त्यावेळी त्यांनी उभाठा प्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ठाकरे गटाचे नेते अनिल परब, किशोरी पेडणेकर यांच्याबाबत पत्रकार परिषदेत आरोप प्रत्यारोप केले

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली ,याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेत काही सवाल उपस्थित केले आहेत.

सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी किशोरी पेडणेकर ताई जायच्या इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता. डॉक्टर बदलले गेले. रुग्णवाहिका बदलली. तीथे जो काही प्रकार झाला तो प्रकरण दडपण्यासाठी झाला. म्हणून दबाव कमी झाल्यावर तिच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली. ते सरकारकडे नाही तर कोर्टात गेले, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  एखाद्या महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाला असेल तर पोलिसांनी त्वरीत एफआयआर दाखल करून चौकशी करावी, आरोपीला अटक करावी असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. हा कायदा तेव्हाही होता. माझ्याकडे कॉपी आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई का केली नाही? वाझे ताब्यात आहे. चार फटके दिले तर सर्व कळेल. या सर्वांचा कर्ताकरविता वाझे आहे. तीच्या वडिलांवर दबाव होता असं राणे यांनी म्हटलं आहे.

हे घाणेरडे कृत्य आहे. ही मर्दानगी नाही. चारपाच लोकांनी एका मुलीला धरायचं आणि तिच्यावर अत्याचार करायचा. तुम्ही सर्वांनी पेटून उठलं पाहिजे. जगात मुंबई पोलिसांचं नाव आहे. पण ते अजून का थांबले याचं आश्चर्य वाटतं. यातील सत्य सर्वांना माहीत आहे. का नाही पेडणेकर बाईंना पोलीस ताब्यात घेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. दिशाच्या आईवडिलांवर का दडपण आणलं गेलं? असा सवालही यावेळी राणे यांनी केला आहे.

तर उद्धव ठाकरेंबाबत बोलताना राणे म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच नाव घेऊ नका अशी विनंती करणारा दुसरा कॉल आला होता. दुसरा फोन कोरोनाच्या काळात आला होता. त्यावेळी आपल्या हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे होती. त्या संबंधित ती परवानगी मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी आदित्यचं नाव घेऊ नका अशी पुन्हा एकदा त्यांनी विनंती केली. तुम्ही जरा या प्रकरणात सहकार्य करा असंही ते आपल्याला म्हणाल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी अनिल परब यांच्या विधानावरून नारायण राणेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी टोला लगावत म्हटलं की, अनिल परब आणि आक्रमकता हे समीकरण तरी जुळतं का? त्यांचा जीव केवढा? अनिल परब यांनी आक्रमकता दाखवावीच कोणताही बाबतीत. आतापर्यंत त्यांनी कुणाच्या कानफाटात मारली हे देखील ऐकिवात नाही. तो भाषण करू शकतो, तो वकील आहे. खोटं नाटक करणं त्याचा तो पेशाच आहे. त्यामुळे त्याने उगाच बढाया मारू नये. जे काही करायचं ते कर पण तोंड बंद कर. असं म्हणत राणे यांनी परब यांचा फज्जा उडवला

संबंधित पोस्ट

29 ऑक्टोबर रोजी शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन   

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर बालगृहे, अनाथाश्रम, वसतिगृहे आढळुन आल्यास शासनास कळविण्याचे आवाहन

मुंबईतील जोगेश्वरी येथे: ओशिवारामध्ये अग्नितांडव! 40 दुकाने भस्मसात फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग…

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाले महिला बचत गटांनी शिवलेले शालेय गणवेश ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत 1,04,703 गणवेश होणार तयार

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ मध्ये तज्ज्ञांचे मत…