vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा…

राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा…

राज्य प्रतिनिधी –

विदर्भात येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पिवळा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार या भागांमध्ये ढगांचा गडगडाट, वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि दमदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

दरम्यान, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यातही काही भागांत पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत मात्र पावसाची शक्यता अत्यल्प आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामामध्ये योग्य ती काळजी घ्यावी, तसेच नागरिकांनी देखील गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

संबंधित पोस्ट

अंबाला येथील अन्नातून विषबाधा; रुग्णांवर उपचार सुरु

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

भारतीय हवाई दलाच्या चिनूक विमानांनी हिमाचल प्रदेशातील चंबा इथल्या मणिमहेश तीर्थक्षेत्रातून अडकलेल्या यात्रेकरूंना यशस्वीरित्या बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta