vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी  संभाजीनगर विभागातील विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी  संभाजीनगर विभागातील विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्स समितीने छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधला.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाला समिती शिफारशी सादर करेल. परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, परीक्षा केंद्रे, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण, पेपर तपासणी, सामान्यीकरण, निकाल, न्यायालयीन प्रकरणे आणि नियुक्ती प्रक्रिया अशा विविध मुद्यांचा अभ्यास करून ह्या शिफारशी समिती सुचवेल, अशी माहिती अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थ्यांच्या भावना व सूचना एकत्रितपणे विचारात घेऊन परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास केला जाईल. प्राप्त सूचनांच्या आधारे शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, असे समितीचे सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सांगितले.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, परीक्षा केंद्रांचे ऑडिट आणि पेपर तपासणीची कार्यपद्धती अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याबाबतही विचार केला जात असल्याचे सदस्य सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी सांगितले,

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, संगणकाधारित व ऑफलाइन परीक्षा पद्धती, वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्रांवरील सुविधा, वेटिंग लिस्ट, ऑडिट तसेच पेपर तपासणीबाबत अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यात येतील, असे सदस्य तथा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सुविधा

अमरनाथ यात्रेकरूंच्या नोंदणीत घट

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंत्रालयातील बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा महत्त्वाचा निर्णय !*_*देवस्थानांच्या हडप केलेल्या जमिनींच्या सर्वेक्षणाचे; तसेच ‘ॲन्टी लँड ग्रबींग ॲक्ट’चा मसुदा तयार करण्याचे आदेश !*

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यांत ‘डिजिटल शेतीशाळा’ 1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन· सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन