vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाफार्मर आयडीसह तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विशेष शिबिरे पात्र शेतकऱ्यांनी शिबिरांचा लाभ घ्यावा ; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाफार्मर आयडीसह तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विशेष शिबिरे पात्र शेतकऱ्यांनी शिबिरांचा लाभ घ्यावा ; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख १४ हजार ८८४ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, अद्याप ३० हजार ६५६ शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे आधार प्रमाणीकरणापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार सिंह, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, तसेच तालुका सहाय्यक निबंधक/सहकार अधिकारी श्रेणी-1, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा समन्वयक, सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी, सहकारी बँकेचे समन्वयक आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत १ लाख ९६ हजार ३३९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार ६८३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. तर ३० हजार ६५६ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण विविध तांत्रिक कारणांमुळे अद्याप प्रलंबित आहे.

प्रलंबित शेतकऱ्यांपैकी १३ हजार ५५१ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप तयार झालेले नाहीत. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करताना फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. त्यामुळे फार्मर आयडीअभावी अनेक पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार ३, ४ व ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित शिबिरांमध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करणे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे तसेच योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या अन्य तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरण किंवा फार्मर आयडीअभावी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी या विशेष शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपली प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावेजिल्ह्यातील मंडळांना ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बँक ऑफ महाराष्ट्रच्या लीज व्यवहारातील संभाव्य अनियमिततेबाबत स्वतंत्र चौकशीची मागणी – खासदार डॉ. कल्याण काळे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र

न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले टीम इंडियाचे अभिनंदन

शिक्षकांच्या हातूनच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार-पालकमंत्री भरत गोगावले,महाडमध्ये आदर्श शिक्षकांचा सन्मान; शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

१० लाख रुपयांची मदत बँक खात्यात जमा; मॅनहोल दुर्घटनेतील दिवंगत असलम शेख यांच्या पत्नीकडून पत्र लिहून महानगरपालिकेचे आभार-श्रीमती अंजुम शेख यांनी महापौरांप्रति व्यक्त केली कृतज्ञता

vishwatmaklokswamivarta