vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न

📍मुंबई प्रतिनिधी-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०२० ते २०२५ या पाच वर्षातील ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. या सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यासह पुरस्कारप्राप्त व्यक्ती, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

#व्यसनमुक्तसमाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. या सोहळ्यात १०० हून अधिक व्यक्ती आणि १३ संस्थांचा गौरव होत असून, हे कार्य राष्ट्रनिर्मितीला बळ देणारे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प आहे. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतात. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी कठोर पाऊले उचलली जात आहेत. ‘व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे,’ असा संदेश देत नागरिकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

#व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजातील अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखी भूमिका बजावली आहे. या क्षेत्रात कार्य करणारे लोक समाजासाठी आशेचा किरण आहेत. व्यसनाच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तींना योग्य दिशेला आणणे हे अत्यंत कठीण आणि महत्त्वाचे काम आहे. हा पुरस्कार हा केवळ सन्मान नसून कार्यकर्त्यांच्या कष्टांची दखल आहे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

या पुरस्कार सोहळ्यात एकूण १०० व्यक्ती व १३ संस्थांना सन्मानित करण्यात आले असून १०० व्यक्तींपैकी ८८ पुरुष व १२ महिलांचा कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना एक वर्षासाठी लागू रायगड जिल्ह्यात ‘भारतीय कृषी विमा कंपनी’ची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्गाची चाचणी संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात काय म्हणाले ते पहा…

लखपती दिदी’च्या माध्यमातून मिळेल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

मिरा रोडच्या नयानगर परिसरातील नूरजहान इमारतीत भीषण दुर्घटना मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला, 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, मिरा रोडमधील दुर्दैवी घटना…

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यदर्शन तर दादर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार