vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

विशेष सखोल पुनरीक्षण; निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना जारी दावे हरकतींसाठी १२ ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ

विशेष सखोल पुनरीक्षण; निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना जारी दावे हरकतींसाठी १२ ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)-विशेष सखोल पुनरिक्षणादरम्यान जुळवणी न झालेले किंवा तार्कीक विसंगती असलेल्या ज्या मतदारांना नोटीस देण्यात आली आहे, अशा मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतः जाऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करतील. तसेच सुनावणीसाठी ऑनलाईन हजर राहणे वा पौढ व्यक्तिस प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची मुभा ही देण्यात आली आहे. तसेच दावे हरकती दाखल करण्याची मुदतही दि.१२ ऑक्टोंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने कळवली आहे.

भारत निवडणूक आयोगाने नुकत्याच महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR-2026) प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण सूचना निर्गमित केल्या आहेत.

त्या याप्रमाणे-विशेष सखोल पुनरिक्षणादरम्यान जुळवणी न झालेले (Unmapped) किंवा तार्कीक विसंगती (Logical Discrepancies) या कारणास्तव ज्या मतदारांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशा मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करतील.

संकलित करण्यात आलेली कागदपत्रे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या (ERO) निर्णयासाठी ECINet पोर्टलवर अपलोड करण्यात येतील. त्यामुळे संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी ERO/AERO कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीत, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यक वाटल्यास सुनावणी आयोजित करण्यात येईल. अशा वेळी प्राधान्याने ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात येईल. तसेच, आवश्यकता भासल्यास संबंधित मतदाराच्या वतीने सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्यास परवानगी देण्यात येऊ शकते.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या विनंतीनुसार, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी दावे व हरकती दाखल करण्याची (नवीन नाव नोदणी, दुरुस्ती व वगळणी) करण्याची अंतिम मुदत दि.१२ऑक्टोबर पर्यंत वाढविली आहे. तसेच, महाराष्ट्रात नोटिसा तसेच दावे व हरकती निकाली काढण्याची अंतिम मुदत दि.१० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत ज्या नागरिकांना नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. संबंधित BLO आपल्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करतील. नागरिकांनी BLO यांना आवश्यक सहकार्य करून उपलब्ध असलेली संबंधित कागदपत्रे सादर करावीत. तसेच, मतदारांनी आपले नाव, पत्ता व इतर तपशील मतदार यादीमध्ये योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. पात्र नागरिकांनी आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरिक्षणाची प्रक्रिया नागरिकाभिमुख, सुलभ व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तसेच संबंधित निवडणूक यंत्रणेने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले आहेत.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदनात जिप्सीचा विशेष खेळ प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा नियोजनचा निधी 25 मार्चपूर्वी खर्च करावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

vishwatmaklokswamivarta

नागरिकांशी थेट संवादासाठी जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत Public App खाते सुरू शासनाच्या योजना व विकासकामांची अधिकृत माहिती आता एका क्लिकवर

सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू – राज्यमंत्री योगेश कदम खेड तालुक्यातील जामगे येथे‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत माजी सैनिक मेळावा उत्साहा

vishwatmaklokswamivarta

दर्पणकारांचे पत्रकारितेतील योगदान आणि आजच्या पत्रकारांची नैतिक जबाबदारी