vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी-महिला व बाल विकास कार्यालयाचे आवाहन

शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी-महिला व बाल विकास कार्यालयाचे आवाहन

 

सातारा, प्रतिनिधी- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी क्षेत्रातील ज्या आस्थापनेमध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असेल अशा सर्व शासकीय,निमशासकीय, खाजगी सहकारी, महामंडळ इ. आस्थापनांमध्ये तसेच कोणतीही खाजगी संघटना, एन्टरप्राइझेस अशासकीय संघटना, ट्रस्ट, उत्पादक पुरवठा विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणुक, औद्योगिक, आरोग्य, वित्त इ.सेवा देणारे युनिट या सर्व ठिकाणी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती 31 जानेवारी पर्यंत गठीत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी केले आहे.

समिती गठीत झाल्यानंतर समितीच्या अध्यक्ष, सदस्यांची नावे पदनाम व संपर्क क्रमांकाचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावा तसेच समिती गठीत केल्याबाबतचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, २ रा मजला, एस.टी.स्टैंड शेजारी, सातारा येथे तात्काळ सादर करावेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार असून या सर्वेक्षणावेळी संबंधित आस्थापनेमध्ये सदर अधिनियमांतर्गत तक्रार निवारण समिती गठीत न केल्याचे निदर्शनास आल्यास अधिनियमाच्या कलम २६ (१) (क) प्रमाणे आस्थापनेस रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. तावरे यांनी कळविले आहे.000

संबंधित पोस्ट

चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचे ऑडिट करणार- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पंढरपूर येथे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे श्रीविठ्ठल-रुक्मिणी दर्शन; राज्यात भरपूर पावसासाठी केली प्रार्थना…

मंगळागौर स्पर्धेतून संस्कृतीचा सोहळा व नारीशक्तीचा जागर – महापौर श्रीम.सुजाता पाटील

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांनी खेळला पर्यावरणपूरक टाळ्यांचा गरबा

vishwatmaklokswamivarta

महाज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण – मंत्री अतुल सावे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण..