vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

 सातारा, प्रतिनिधी : सन 2024 वर्षातील मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर, 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले प्रथम आवृत्ती पुस्तके स्पर्धेसाठी पात्र आहेत. लेखकांनी पुरस्काराच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) दि. 31 जानेवारी, 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व ‘What’s new’ या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award 2024 Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 31 जानेवारी 2025 पर्यंत पोहचतील अशा पाठवाव्यात.

लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक 31 जानेवारी 2025 पर्यंत पाठवावे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.0000

संबंधित पोस्ट

मांतग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; अर्ज करण्याचे आवाहन

श्रम शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार – कामगार मंत्री ॲड. फुंडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमध्ये सामंजस्य करार

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा*१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी..

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलीस कुटूंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा -वनमंत्री गणेश नाईक

करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन