vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या दिवाळी अंकाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेला बळ; ग्रामीण उद्योजकतेला चालना देणाऱ्या उपक्रमांची दिवाळी अंकात मांडणी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या दिवाळी अंकाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेला बळ; ग्रामीण उद्योजकतेला चालना देणाऱ्या उपक्रमांची दिवाळी अंकात मांडणी

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात करण्यात आले. उद्योग, व्यापार, उद्योजकता तसेच ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या विविध विषयांवरील लेखांचा या विशेषांकात समावेश करण्यात आला आहे.

            ग्रामीण भागात उद्योजकतेची संस्कृती रुजविणे, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’ या संकल्पनेवरही या अंकात विशेष भर देण्यात आला आहे.

            यावेळी व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे, संपादकीय सल्लागार शिवाजी मानकर, सर कार्यवाहक सुरेश घोरपडे, आणि ॲड. रिचा पाठक, उपस्थित होते.

  यावेळी चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी ‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. गावागावांत उद्योजक निर्माण व्हावेत, स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन मिळावे आणि ग्रामीण युवकांना रोजगाराऐवजी रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने या उपक्रमाची आखणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

000

संबंधित पोस्ट

नाथषष्ठीनिमित्त सोमवारी (दि.९) पैठण येथेजिल्हा प्रशासनाचा ‘सेवाभक्ती संगम’

डॉ. संजय मुन हे फुले – आंबेडकरी चळवळीचे प्रभावी प्रसारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे गौरोद्गार : डॉ. संजय मुन यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे असे असे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार अजित पवार आपल्या x सोशल मीडिया अकाउंट वर म्हटले आहे

महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार• शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनातून साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांना लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

तंबाखूमुक्त पिढीच्या दिशेने जालना जिल्ह्याचे दमदार पाऊल; जिल्ह्यातील 101 शाळा तंबाखूमुक्त*

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट!१० वर्षांत काशी आणि मथुरा मुक्त होतील!- अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद