vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

जालना-प्रतिनिधी-माळी समाजाच्या वतीने आगामी 27 डिसेंबर 2026 रोजी चिखली शहरात कृष्णप्रिय मंगल कार्याल्य व लॉन येथे आयोजित करण्यात येणाऱ्या उपवर-वधू पालक परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनासाठी जालना शहरात शासकीय विश्रामगृह जालना येथे दि. 1 नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात येवून, विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हा मेळावा व विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे, कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.बैठकीची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी आगामी मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या, नियोजन आणि कामकाज याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माळी समाजाची सामाजिक, आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील प्रगती, तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर समाजासमोरील विविध प्रश्नांवर उपस्थित विचारवंतांनी आपले विचार मांडले.यावेळी आयोजन समिती अध्यक्ष श्रीराम झारे, मधुकरराव जाधव, अभय तायडे, केशवराव दळवी, प्रा. दिपक नन्हई, कोषाध्यक्ष श्रीधरराव पुंड, जालना जिल्हाध्यक्ष गणेशराव हरकळ , मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे, बबनराव घायाळ, कर्मचारी आघाडी अध्यक्ष रमाकांत वाघमारे, सचिव इंजि. सुरेश खांडेभराड, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगलताई खांडेभराड, उपाध्यक्षा संगिता फुलझाडे, शिक्षक आघाडीचे सचिव राजाभाऊ घोडके, सरचिटणीस महेश खरात, शहराध्यक्ष गजानन खांडेभराड, कोषाध्यक्ष कैलास रसाळ, सहसचिव बाबासाहेब गाडेकर, तालुका संघटक रामेश्वर अनारसे, शहर उपाध्यक्ष रुपेश बारवकर, जालना तालुकाध्यक्ष छगन किटाळे, विजय खैरे, रूपेश बारवकर, मंठा तालुकाध्यक्ष महादेव हजारे,मालतीताई जमधडे, रेखा जमधडे यांच्यासह महिला व पुरूष समाजबांधव उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन माळी महासंघ कर्मचारी आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी केले, तर सावता तिडके यांनी आभार प्रदर्शन केले.

–00000

संबंधित पोस्ट

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन;युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित

सायन कोळीवाडा जी. टी. बी. रेल्वे स्टेशन लटकत्या जाहिरात फलकावर कारवाई मागणी -रेल्वे प्रवासी

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून गुणगौरव,ग्रामविकासातील उल्लेखनीय योगदानाची दखल; प्रशस्तीपत्रक व सन्मान पदक देऊन गौरव

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026” चा समारोप