vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

 

    राज्य प्रतिनिधी-  महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे मार्च महिन्याच्या लोकशाही दिनामध्ये प्राप्त अतिक्रमण विभागाशी निगडीत 1 अर्जदाराच्या निवेदनावर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष सुनावणी घेतली आणि तत्पर कार्यवाहीचे आदेश दिले.

          माहे एप्रिल महिन्याचा लोकशाही दिन दि. 2 जून एप्रिल 2026 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 20 मार्च 2026 पर्यंत मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.

          लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळाच्या (Website) मुख्यपृष्ठावर जलद दुवे (Quick Links) आयकॉनवर उपलब्ध असून ती अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्ले गांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथेही प्रत नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

          अर्ज करताना नागरिकांनी शासन निर्णयानुसार अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे याची दखल घ्यावयाची आहे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक- आस्थापना विषयकबाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावयाची आहे.

          विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

दहिपुरी मध्ये आज सत्यभामा सिताराम हनवते परिवाराकडून गरजूंना पंधरा किटचे वाटप.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज घेण्यासाठी मोहीम सुरु

जागतिक पर्यावरण दिन विशेष पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम..

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…

प्रभावी जनसंपर्कासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय आवश्यक – निवासी आयुक्त आर. विमला ‘माहिती आणि जनसंपर्क ‘च्या राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेस प्रारंभ