vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

हिवाळी कालावधीत ऋतुमानानुसार होणारी पानगळ नैसर्गिक

हिवाळी कालावधीत ऋतुमानानुसार होणारी पानगळ नैसर्गिक

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र हे पानझडी जंगल (Deciduous Forest) स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे येथे हिवाळयाच्या कालावधीत काही झाडांची पानगळती होऊन त्या झाडांना कालांतराने नवी पालवी फुटत असते.

          नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात निरनिराळया जातीची वृक्षसंपदा मोठया प्रमाणात आहे. त्यामधील काही झाडांची पानगळती विशिष्ट ऋतूनुसार होताना दिसून येते. या पानगळतीबाबत पर्यावरणप्रेमी, समाजसेवक, पत्रकार, वृक्षप्रेमी, नागरिक यांच्याकडून विविध माध्यमांतून चिंता व्यक्त होताना दिसून येते.

          वास्तविकत: हिवाळयात झाडांची पाने गळणे ही अत्यंत नैसर्गिक आणि महत्वाची प्रक्रिया आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. याला शास्त्रीय भाषेत पर्णपात (Abscission) असे म्हणतात. हिवाळयात झाडांमध्ये ऐबासीसिक ॲसिड नावाचे संप्रेरक तयार होते. यामुळे फांदी आणि पानांच्या देठांमध्ये एक पातळ स्तराची भिंत तयार होते. या स्तरामुळे पानाला मिळणारे पाणी आणि पोषक तत्त्वे थांबतात आणि पाने सुकून खाली पडतात. मात्र काही कालावधीनंतर या झाडांना नवी पालवी फुटते.

          नवी मुंबई महानगरपालिका उदयान विभागामार्फत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वृक्षांची वेळोवेळी योग्य ती निगा राखली जाते. ऋतुमानानुसार निसर्गत:च होणारे बदल समजून घेऊन निसर्गाच्या विविध बदलांचे स्वागत करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 20.77 टी.एम.सी. पाणीसाठा

विठ्ठल नामाचा गजर… महाराष्ट्राच्या संतपरंपरेची रोमेनियामध्ये भक्तीमय झलक!”🚩

महसूल विभागाची धडक कारवाई; खडकपुर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट…

vishwatmaklokswamivarta

 जालना नांदेड सर्मुध्दी महामार्ग च्या मावेजा व इतर मागण्यांच्या विरोधात मागील ४ दिवसांपासून शेतकरी देवमूर्ती ता. जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत तेथे भेट दिली व त्यांच्या समस्यांवर चर्चा करून मा. जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन दिले

नीट’ परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• परीक्षेच्या पूर्वतयारी, सज्जतेचा आढावा• प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त; वैद्यकीय पथके तैनात• सीसीटीव्ही कार्यान्वित; ड्युटी मॅजिस्ट्रेट व स्टेट ऑब्झर्वर यांची नियुक्ती

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

vishwatmaklokswamivarta