vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

 जालना नांदेड सर्मुध्दी महामार्ग च्या मावेजा व इतर मागण्यांच्या विरोधात मागील ४ दिवसांपासून शेतकरी देवमूर्ती ता. जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत तेथे भेट दिली व त्यांच्या समस्यांवर चर्चा करून मा. जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन दिले

 जालना नांदेड सर्मुध्दी महामार्ग च्या मावेजा व इतर मागण्यांच्या विरोधात मागील ४ दिवसांपासून शेतकरी देवमूर्ती ता. जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत तेथे भेट दिली व त्यांच्या समस्यांवर चर्चा करून मा. जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन दिले.

 

. जालना प्रतिनिधी :- जालना–नांदेड समृद्धी महामार्गात संपादित होणाऱ्या शेतजमिनीच्या विषयी शेतकऱ्यांच्य विविध न्याय मागण्यांबाबत.उपोषणाला बसलेले आहेत तेथे भेट दिली व त्यांच्या समस्यांवर चर्चा करून मा. जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन दिले.

   जालना-नांदेड समृद्धी महामार्ग हा जालना तालुक्यातील जवळपास १५ ते २० गावातील शेताजमिनिमधून संपादित केला जात आहे,परंतु सदरील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी संपादित केल्या जात असतानी सदर कामामध्ये शेतकर्यांच्या प्रश्नांनकडे, मागण्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. आजपर्यंत सदरील संपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलने, उपोषणे केली व त्यावरती प्रशासनाने वेळकाढू पणा करून तात्पुरती आश्वासने शेतकऱ्यांना देण्यात आली परंतु प्रशासनाकडून अद्यापही त्या बाबत ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्यामुळे शेतक-यांना परत एकदा उपोषणाला बसण्याची वेळ प्रशासनाने आणलेली आहे. मागील चार दिवसांपासून जवळपास १०० ते १५० शेतकरी देवमूर्ती ता.जालना या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात उपोषण करत आहेत, तरी शेतकऱ्यांच्या खालील मागण्यांसंदर्भात गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम प्रशासनामार्फत तातडीने करण्याची वेळ आलेली आहे.

१) जालना-नांदेड समृद्धी महामार्गात संपादित होणाऱ्या जालना शहारालगतच्या देवमूर्ती,पानशेंद्रा,गवळी पोखरी,सिंधीकाळेगाव,रामनगर व इतर सर्व गावातील शेतजमिनींना बाजारभावा प्रमाणे मोबदला निश्चित करून त्याच्या पाच पट मोबदला देण्यात यावा.

२) जालना-नांदेड समृद्धी महामार्गा मध्ये संयुक्त मोजणीमध्ये आलेल्या सर्व घटकांचा मोबदला निश्चित करण्यात यावा व पुन्हा मुल्यांकन करून नवीन अवार्ड तयार करण्यात यावे.

३) जालना-नांदेड समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या संपादित होणाऱ्या शेतजमिनींचे मुल्यांकन करत असतानी त्यामध्ये असलेले घर,विहीर,गोठा,बोरवेल यांचे मुल्यांकन करण्यात यावे तसेच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या शेतजमिनींचे बागायती म्हणून मुल्यांकन करण्यात यावे.

४) ज्या शेतकऱ्यांच्या संयुक्त मोजणी करते वेळेस झालेल्या चुकांमुळे आक्षेप अर्ज आले असतील त्यांच्या सुनावण्या घेऊन त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी व तसे दुरुस्त अवार्ड करण्यात यावेत.

५) जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे शेतकऱ्यांचे चालू असलेल्या आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करून शेतकर्यांनी आंदोलन पुढे चालू ठेऊ नये या साठी ठोस प्रयत्न करण्यात यावेत.

६) तसेच जोपर्यंत सदर महामार्गासाठी ८०% शेतकरी सहमती देत नाहीत तोपर्यंत सदरील महामार्गाचे कोणत्याही प्रकारचे काम शेतकऱ्यांवर बळजबरी करून चालू करण्यात येऊ नये.

आपली सकारात्मक व तात्काळ कृती अपेक्षी आहे.

या वेळी जालन्याचे मा. आमदार कैलासजी गोरंटयाल, जालना जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. राजाभाऊ देशमुख, विजयजी चौधरी, जाफ्राबाद कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर शिंदे, जालना पंचायत समितीचे मा.उपसभापती मा. सोपान तिरुखे, गोपाल मोरे, गणेश खरात, दिलीप राठी, राजेश राठोड, ज्ञानदेव इंगोले व इतर शेतकरी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन*राज्यातील 54 नदी प्रदूषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार*

कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर’ या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हा क्षयमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा*

सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta