vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेशस्थानिक बातम्या

खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी पटकावले स्वर्णपदक..

खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी पटकावले स्वर्णपदक..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या युवा नेमबाजांनी खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये आपल्या अचूक नेमबाजीने स्वर्णपदकांवर नाव कोरले. बिहार येथे आयोजित शूटिंग स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेदांत नितिन याने 50 मीटर थ्री पोजीशन्स राइफल (पुरुष युवा वर्ग) मध्ये 452.5 गुणांसह स्वर्णपदक पटकावले. त्याने हरियाणाच्या रोहित कन्यन (451.9) आणि पंजाबच्या अमितोज सिंह (440.1) यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.

दुसरीकडे, नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या 17 वर्षीय प्राची गायकवाड हिने 50 मीटर राइफल थ्री पोजीशन (युवा महिला वर्ग) मध्ये 458.4 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. प्राचीने स्थिरता आणि आत्मविश्वास दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. मुंबईत अरुण वारेसी, बिबास्वान गांगुली आणि शुभम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या प्राचीला तिचे वडील शशिकांत गायकवाड यांच्या प्रोत्साहनामुळे नेमबाजीची आवड निर्माण झाली. वयाच्या पाचव्या वर्षी नेमबाजीला सुरुवात करणारी प्राची, स्वप्निल कुसळे यांना आपले आदर्श मानते

00000000

संबंधित पोस्ट

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता 23 जूनपासून नवीन मालिका..

२४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंदयंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस..

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण

मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्याची मागणी-मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे

चीनची अडवणूक   भक्तांचे व्हिसा रोखले कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पुण्यातील 52 महादेव भक्त नेपाळमध्ये अडकले

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

vishwatmaklokswamivarta