vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

१७ वर्षांपासून फरार असलेला हत्या प्रकरणातील आरोपी अखेर अटकेत; मुलुंड पोलिसांची मोठी कामगिरी!

१७ वर्षांपासून फरार असलेला हत्या प्रकरणातील आरोपी अखेर अटकेत; मुलुंड पोलिसांची मोठी कामगिरी!

मुंबई : प्रतिनिधी- सन २००९ मध्ये मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्या प्रकरणात गेल्या १७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर मुलुंड पोलिसांनी टिटवाळा येथून अटक केली आहे. फिरोज मोहम्मद सुलेमान शेख (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमके प्रकरण काय?२० जून २००९ रोजी जुन्या वादातून आरोपी फिरोज, अफरोज आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी मिळून इराम उर्फ मसकूर याची हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोजच्या भावाला मृत व्यक्तीसोबत काम करत असताना डोळ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याची दृष्टी कायमची गेली होती. तसेच गावातील जमिनीवरूनही दोन्ही बाजूंमध्ये जुना वाद होता.

याच वैमनस्यातून आरोपींनी मसकूर यांच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात CR No. 218/2009 अंतर्गत भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१७ वर्षे पोलिसांना देत होता चकवा!घटनेनंतर आरोपी आपली ओळख आणि राहण्याचे ठिकाण लपवून फरार झाला होता. बिहारमधील त्याच्या मूळ गावीही पोलिसांनी शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. त्यामुळे त्याला वाँटेड आरोपी घोषित करण्यात आले होते.मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लभडे आणि पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल महाजन यांच्या पथकाने बिहारमधील गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला.

गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याचे तसेच वारंवार मोबाईल फोन आणि सिमकार्ड बदलत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.अखेर आरोपी बिहारमधील मूळ गाव सोडून टिटवाळा पूर्वेकडील बनेली गावात लक्ष्मण चाळ, रूम क्रमांक ०२ येथे आपल्या कुटुंबासह राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे तो एका बांधकामाच्या ठिकाणी फिटर म्हणून काम करत होता.

या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने कारवाई करून त्याला टिटवाळा येथून ताब्यात घेतले. चौकशी आणि तपासादरम्यान तो २००९ मधील हत्या प्रकरणातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई,ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोज कुमार, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त पूर्व परिमंडळ-३ अभयसिंह देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मुलुंड विभाग सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लभडे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल महाजन, पोलीस हवालदार चव्हाण, शेडगे, चौघुले तसेच पोलीस शिपाई शिंपी, करदोरे, गावडे, सरकटे आणि आव्हाड यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

तब्बल १७ वर्षांपासून फरार असलेल्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात मुलुंड पोलिसांना यश आले असून, या कामगिरीमुळे मुलुंड पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

संबंधित पोस्ट

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आज कुख्यात अमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कीयेमधून परत आणण्यात मोठे यश मिळवले

पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २.०३ कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

रायगड (उरण) – अडीच लाखांचं हेरॉईन जप्त; ३ आरोपी अटक

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई -दरोडे टाकणाऱ्या बदाम गॅंग च्या सात आरोपींना अटक

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा, उद्योजक आणि संस्था चालकाकडून  महिलांचे लैंगिक शोषण…

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई