vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा, उद्योजक आणि संस्था चालकाकडून  महिलांचे लैंगिक शोषण…

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा, उद्योजक आणि संस्था चालकाकडून  महिलांचे लैंगिक शोषण…

राज्य प्रतिनिधी-: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण  गाजत आहे. याप्रकरणात दररोज नवंनवीन खुलासे होत आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात अशोक खरात तुरुगांत आहे.   भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांच नाही तर व्यावसायिकांनाही लुटलं आहे. त्यांची गुन्हेगारी जगातील कारनामे तपासात समोर येत आहे. अशातच नाशिकमध्ये अजून एका अशोक खरात पार्टन 2 समोर आलं आहे. सातपूरमधील व्यावसायिकाचा टॅब चोरीला गेला होता. ज्यात 200 हून अधिक अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात महिलांना समोर येऊन गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले होते

त्यानंतर  व्यावसायिकावर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड जप्त नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका बड्या व्यावसायिकाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 12 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्या चार चोरांना अटक केली. त्यानंतर पोलिसांना या अश्लील व्हिडीओमागे काहीतरी दडलंय अशा संशय आला होता. त्यांनी तपास सुरु ठेवला आणि महिलांना पुढे येण्याचे आवाहन केलं. त्यानंतर एका महिलेने व्यावसायिक आणि एनजीओ संचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उद्योजक आणि एनजीओ संचालकाकडून 100 हुन महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.संशयित आरोपी रवींद्र एरंडे (वय 63) ला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गरजू महिलांचे आक्षेपार्य व्हिडीओ बनवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या या व्यावसायिका विरोधातच पीडित महिलेकडून पहिला गुन्ह्याची नोंद झली आहे. टॅबमध्ये पोलिसांना 87 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड जप्त केली आहेत. गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप व्यावसायिक रवींद्र एरंडे यांच्यावर करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार करुन तो गुपचूप चित्रीकरण करायचा. त्यानंतर या व्हिडीओच्या माध्यमातून तो गरजू महिलांना त्रास देत असे. एवढंच नाही तर अश्लील व्हिडीओ ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात विक्रीचा देखील संशय पोलिसांना आहे. त्यादिशेने पोलीस पुढचा तपास करत आहेत. महिलांना ब्लॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का या बाबत देखील पोसीस तपास करत आहेत. चौकशी दरम्यान असं समोर आलं की, पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. आरोपीवर बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील इतर स्पॉट्स आणि लिंकचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

संबंधित पोस्ट

माटुंगा पोलिसांची मोठी कारवाई : चोरीच्या आरोपीला अटक, चार गुन्ह्यांची उकल…

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला

vishwatmaklokswamivarta

ठाण्याचे उपायुक्त शंकर पाटोळे (अनधिकृत बांधकाम विभाग) यांना लाच घेताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ३५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ …

बालिकेची माहिती देणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस दलाकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर 

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई

आईस्क्रिम म्हणून फ्रोझन डेझर्टचा वापर;ज्युस सेंटरवर कारवाई