vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेठळक बातम्या

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून अहिल्यानगर आणि पुणे येथून आणखी दोन आरोपींना अटक

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून अहिल्यानगर आणि पुणे येथून आणखी दोन आरोपींना अटक

राज्य प्रतिनिधी-नीट-यूजी (NEET-UG) 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणी, केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) गेल्या 24 तासांत आणखी दोन आरोपींना अटक केली असून, देशभरात 14 ठिकाणी शोध मोहीम राबवली.

नीट-यूजी 2026 परीक्षेच्या आयोजनातील अनियमिततेबाबत शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारावर, सीबीआयने 12 मे 2026 रोजी गुन्हा दाखल केला होता.

यापूर्वी, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. यात जयपूर इथून तीन, गुरुग्राम मधून एक आणि नाशिक मध्ये अटक केलेल्या एका आरोपीचा समावेश आहे. या पाचही आरोपींना आज दिल्ली मधील न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी त्यांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले.

12 मे 2026 रोजी सुरू केलेली आपली देशव्यापी मोहीम पुढे नेत, सीबीआयच्या विशेष पथकांनी गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात पुणे आणि अहिल्यानगर मध्ये प्रत्येकी एक, अशा आणखी दोन आरोपींना अटक केली.अटक करण्यात आलेले आरोपी:धनंजय लोखंडे, अहिल्यानगर मनीषा वाघमारे, पुणे इतर अनेक संशयित व्यक्तींची सध्या चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाशी संबंधित सर्व धागेदोरे तपासले जात असून, सर्वसमावेशक, निष्पक्ष आणि व्यावसायिक तपास करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असे सीबीआयने म्हटले आहे

0000

संबंधित पोस्ट

रामनवमी शोभायात्रेच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांकडून आढावा

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मदत करणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील ‘मिनी सरस-२०२५ प्रदर्शनास’ भेट

vishwatmaklokswamivarta

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान– आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळातर्फेकर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतकर्‍यांना मदतीची मागणी करणार्‍या हंबर्डा मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा !: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

vishwatmaklokswamivarta