vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हास्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026” चा समारोप

जिल्हास्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026” चा समारोप

जालना, प्रतिनिधी : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026” या उपक्रमाचा जिल्हास्तरीय समारोप सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमास खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खासदार डॉ. काळे यांनी, जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करत, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. तसेच जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर देत, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. जलस्रोतांचे जतन, पाण्याचा योग्य वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी पाणी संवर्धनाचे महत्त्व सांगुन, “पाणीटंचाई टाळण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले. पंधरवड्याच्या कालावधीत जिल्हाभरात जलस्रोतांची स्वच्छता, गाळ काढणे, नाला खोलीकरण, बंधारे दुरुस्ती, वृक्षारोपण आणि “पाणी अडवा–पाणी जिरवा” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.या उपक्रमांमुळे जलसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली असून, पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण झाली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.हा पंधरवडा जिल्ह्यात जलसाक्षरता वाढविण्यास आणि पाणी बचतीच्या चळवळीला बळ देण्यासाठी प्रभावी ठरल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी बांधव, जिल्ह्यातील जलदूत व दोन्ही पाटबंधारे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यामध्ये पाटबंधारे विभागामार्फत पाणीबचत, जलसंवर्धन, शेतकरी/पाणी वापर संवाद, भूसंपादन व पुनर्वसन अडचणी निराकरण , जल लेखापरीक्षण इत्यादी विषयावर प्रबोधन करण्यात आले. यासोबतच ग्रामपंचायत चावडी, शाळा, बस स्थानके, इत्यादी ठिकाणी जल प्रतिज्ञा व पथनाट्याद्वारे जलजागृती करण्यात आली. जालना पाटबंधारे विभागामार्फत आयोजित सर्व कार्यक्रमास नागरिक , शेतकरी यांचा सहभाग लाभला तसेच इतर विभागांचा सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमास नागरिक, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल- उपमुख्यमंत्री अजित पवारश्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मदतीतून विजय शिंदेंचा सोललेल्या लसूण विक्रीचा व्यवसाय..

vishwatmaklokswamivarta

मुंबई सह उपनगरात आणि राज्यात रायगड जिल्ह्यात   जोरदार पाऊस …

महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडु महाप्रसाद वाटप समितीची निवड

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन, दगडूशेठची मिरवणूक सुरु, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पार्टी जालना महानगर चार मंडळाच्या नियुक्त्या जाहीर!सुनील खरे, संजय डोंगरे, महेश निकम, अमोल धानुरे यांचा समावेश विकास कामे शहरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवा – भास्कर आबा दानवे