vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ आणिमच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ आणिमच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबई, प्रतिनिधी : गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये वाढ होणे आणि मच्छिमारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी एक सर्वंकष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मत्स्य व्यवसाय मंत्री राणे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये प्रवीण दरेकर, उमा खापरे, भाई जगताप, प्रसाद लाड, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

    गोड्यापाण्यातील मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी या क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता आणणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. राणे म्हणाले की, यासाठी एक सर्वंकष धोरण विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच विभागाकडे असलेल्या सर्व तलावांची माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मत्स्योत्पादनात सध्या महाराष्ट्र १७ व्या स्थानावर आहे. राज्य मत्स्योत्पादनामध्ये ३ ऱ्या क्रमांकावर यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मासेमारीला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात येणार आहे. तसेच मत्स्योत्पादन वाढीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येईल. याशिवाय तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील तलावांमध्ये अतिक्रमणही झाल्याचे निदर्शनास येत आहे. यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री राणे यांनी दिली.

0000

संबंधित पोस्ट

अमृत’तर्फे ‘मानसमित्र’चे मोफत प्रशिक्षण;समुपदेशन क्षेत्रात संधी

आज गुरुवार, ३ सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्या मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात शिवसेना ठाण्यात करणार ट्रेनचे जंगी स्वागत   खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश  

vishwatmaklokswamivarta

सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ..

१९६२ कॉल सेंटर’ व मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध

बांधकामे, गार्डन, स्टेडियम, इन्स्टिट्युट येथे प्रक्रियाकृत पाण्याचाच वापर करावा – नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे