vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नांदेडच्या भूमीवर होणारा शहिदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

नांदेडच्या भूमीवर होणारा शहिदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

नांदेड, प्रतिनिधी : सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा आणि त्यागाची पवित्र भूमी आहे. या भूमीवर होणारा शहिदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. विविध समाजातील लोक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री श्री. मान यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

सेवा हाच खरा धर्म आहे. या सोहळ्यातून समता, बंधुता आणि करुणेचा संदेश देशभर पोहोचत आहे. हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यांचे कार्य, त्याग व विचार येणाऱ्या पिढीसमोर असणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री. मान यांनी सांगितले. नांदेड येथील पंजाब भवनचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुढाकार : राज्य समन्वयक रामेश्वर नाईक

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास घराघरात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शाळा, महाविद्यालयात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनावरील माहितीपट, गीत दाखविण्यात येत असून या माध्यमातून त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचला आहे. नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होत असलेल्या या कार्यक्रमात विविध राज्यातून भाविक दाखल होत आहेत. हा कार्यक्रम सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा ठरणार आहे, असे राज्य समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी यावेळी सांगितले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. तुषार राठोड, संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज, संत बाबा बलविंदर सिंघ जी, महंत रघु मुनी यांच्यासह संत, महंत यावेळी उपस्थित होते.

 

0000

संबंधित पोस्ट

सन 2025 मध्ये साजरे होणाऱ्या-राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन जाहीर…

vishwatmaklokswamivarta

तीन महिन्यात सहा बालविवाह रोखण्यात यश**बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांचा पुढाकार आवश्यक*- *जिल्हाधिकारी संतोष पाटील* *महिला व बालविकास विभागाकडील विविध विषयांची आढावा बैठक संपन्न*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणेची अधिकृत वेबसाईट नागरिकांसाठी सुलभ व पारदर्शक

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी अचानक पुराचा लोंढा वस्तीत घुसल्यानं घरं दुकानं तसंच वाहनांचंही नुकसान झालं.