vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बंजारा समाजाच्या बोलीभाषेचा समावेश 8 व्या अनुसूचीमध्ये करावा- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

बंजारा समाजाच्या बोलीभाषेचा समावेश 8 व्या अनुसूचीमध्ये करावा- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

राज्य प्रतिनिधी-

बंजारा समाजातील देशभरातील 14 कोटीपेक्षा अधिक लोक एकच गोर बोलीभाषा बोलतात, या बोलीभाषेचा समोवश संविधानातील 8 व्या अनुसूचीमध्ये करावा, अशी मागणी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमामध्ये केली.बंजारा लोक देशभरातील कोणत्याही राज्यातील असतील तरी त्यांची बोलीभाषा गोर ही एकच आहे. ते आपआपसात गोर भाषेतच संवाद साधतात. त्यामुळे या भाषेला सांविधानिक दर्जा मिळावा, असे ते यावेळी म्हणाले.संत सेवालाल महाराज हे महान क्रांतीकारी, विज्ञानवादी, दूरदृष्टी असणारे संत होते. त्यांनी 250 वर्षा आधी सांगीतले होते, पाणी विकत घेऊन पिऊ अशीही एक वेळ येईल. आज ते सत्यात आपण पाहत आहोत.

संत सेवालाल महाराजांनी सांगीतले आंधळेपणाने कुणावरही विश्वास न ठेवता, तावून सुलाखून तपासल्यानंतरच विश्वास ठेवाव, असा विज्ञानवादी दृष्टीकोण संत सेवालाल यांचा होता.महाराष्ट्र राज्य शासन संत सेवालाल महाराज यांची जयंती राज्यभर साजरी करून त्यांच्या कार्याला अभिवादन करते, असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. राज्य शासनाने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बरीच पाऊले उचलली आहेत, बंजारा समाजतील आराध्य दैवत असलेले वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी या स्थळाचा जिर्णोउद्धार महाराष्ट्र शासनाने केलेला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वेगवेगळया राज्यात बंजारा समाजाचे नातेवाईक राहतात. त्यांची बोलीभाषा, पेहरावा, खानपान, चालीरीती, पंरपरा एकसारखे असूनही हे लोक वेगवेगळया वर्ग घटकात मोडतात. त्यामुळे काहीना शासनाच्या योजनेचा लाभ मिळतो तर काही वंचित राहतात. या बंजारा समाजातील सर्वांची प्रगती एक सारखी व्हावी यासाठी त्यांना एका वर्ग घटकात सामील करण्याची मागीणीही त्यांनी या मंचावरून केली. यासह राजधानी दिल्लीत बंजारा भवन उभारण्यासाठी जागा मिळावी, देशभर असणारे बंजारा समाजातील तीर्थस्थळांना विकस‍ित करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

अमृता देवेंद्र फडणवीस यांना ‘बंजारा कला रत्न’ पुरस्कार प्रदानसुप्रसिद्ध बँकर, गायीका, सामाजिक कार्यकर्ती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांना आज ‘बंजारा कला रत्न’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.श्रीमती फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांचे गुणगाण करणाऱ्या गाण्यांवर आधारित अल्बमध्ये ‘मारो दवे सेवालाल….’ हे गेय गीत गायले तसेच अभ‍िनय ही केला. त्यांचे हे गाणे बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय ठरत आहे.

श्रीमती फडणवीस यांनी त्यांचे मनोगताची सुरवात गोर या बोली भाषेतून करून उपस्थित समाजाची मने जिंकली. त्यांनी सांगीतले संत सेवालाल यांच्याबद्दलची अधिक माहिती गीत गाताना कळली. संत सेवालाल यांच्या आशीवार्दाने मी हे गाण गाऊ शकले. संत सेवालाल हे गोमाता प्रिय, स्त्रींचा आदर राखणारे, पर्यावरण प्रिय, सामान्य लोकांप्रती दयाभाव राखणारे असे महान संत होऊन गेले. संत सेवालाल हे आधुनिक आणि अध्यात्म‍िक दोन्हींचे मुर्तिमंत उदाहरण आहेत. आपण याच समाजाचा एक भाग असल्याचे आपल्याला प्रत‍ित हो असल्याच्या भावन‍ा त्यांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. या कार्यक्रमात त्यांनी पांरपारीक वेशभूषा धारण केलेल्या महिलांसोबत नृत्यही केले.

आज झालेल्या कार्यक्रमात देशभरातील 15 राज्यातून बंजारा समाजातील लोक त्यांच्या पांरपारीक वेशभूषेत सहभागी झालेत. सोलापूर जिल्ह्यातून खास मोठा हार स्वागतासाठी आणण्यात आला. या कार्यक्रमात लोक गीत आणि लोकनृत्य लोक कलाकरांनी सादर केले.

संबंधित पोस्ट

श्री सेवागिरी प्रदर्शनात कृषि विभागाचा स्टॉल ठरतोय आकर्षण*

विशेष वृत्त -जालना जिल्ह्यातील 34 रुग्णालये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत मागील तीन महिन्यात 76 रुग्णांना 56 लाख 75 हजार रुपयांची मदत…

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण-प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार– कृषिमंत्री कोकाटे

vishwatmaklokswamivarta

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तिरंगा रॅलीचे 20 मे रोजी आयोजन

ॲडव्हान्टेज महा.एक्स्पो-२०२६ च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta