vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ॲडव्हान्टेज महा.एक्स्पो-२०२६ च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

ॲडव्हान्टेज महा.एक्स्पो-२०२६ च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – ॲडव्हान्टेज महा.एक्स्पो-२०२६ या दि.८ ते ११ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या नियोजित उद्योग प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला.

 आढावा बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, मनपा चे अपर आयुक्त रणजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उद्योग सहसंचालक स्वप्निल राठोड,ऑरिक सिटीचे शैलेश धाबेकर, अरुण दुबे, कार्यकारी अभियंता आर.डी. गिरी, प्रदर्शनाचे समन्वयक अनिल पाटील तसेच मसिआ व अन्य संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते

 येथील मसिआ व अन्य औद्योगिक संघटना, संस्थांच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासन, सुक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योग, ऑरिक सिटी, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्य सहयोगातून ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन ऑरिक सिटी येथे दि.८ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत केले जाणार आहे. या औद्योगिक प्रदर्शनात देशातील तसेच विदेशातील अनेक उद्योजक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणार आहेत. तसेच येथे सामंजस्य करार, चर्चासत्रे आदी होणार आहेत.

 बैठकीत माहिती देण्यात आली की, हे प्रदर्शन ऑरिक सिटीच्या आवारात २७.५ एकर क्षेत्रात भव्य आयोजीत होणार आहे. त्यात १५०० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. त्यात देशविदेशातील उद्योजक येणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची विशेष ओळख दर्शविणारे , येथील संस्कृती, कला यांचे दर्शन घडविणारे स्टॉल्स लावले जाणार आहेत. जेणेकरुन येणाऱ्या बाहेरच्या उद्योग प्रतिनिधींना त्याची ओळख होईल. त्याच प्रमाणे येथे उत्पादन, ऑटोमोबाईल, कृषी, टेक्सटाईल, फुड, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, पर्यटन, आतिथ्य उद्योग अशा विविध उद्योग क्षेत्रातील प्रदर्शने लावली जाणार आहेत

 १आयोजनाच्या ठिकाणी येण्या जाण्याचे मार्ग, वैद्यकीय सुविधा, रुग्ण वाहिका, अग्निशमन वाहने, इंटरनेट सुविधा, नियंत्रण कक्ष , हेल्पलाईन सुविधा इ. बाबत प्रशासनाच्या सहयोगाने उपलब्धता करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित विभागांना निर्देशित केले.

०००००

संबंधित पोस्ट

देशाच्या प्रगती आणि सशक्तीकरणात अग्रवाल समाजाचे योगदान प्रेरणादायी” — लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर तीथक्षेत्र विकासासाठी 4150.46 कोटीच्या विकास आराखड्यास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता

तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी बालकांना सुट्टी देण्याची आयोगाची शिफारस पोषण आहाराची पर्यायी व्यवस्था करा; बालहक्क संरक्षण आयोगाचे महिला व बालकल्याण विभागाला निर्देश,बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती..

मोठी बातमी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता..

उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील 42 कामांना प्रशासकीय मान्यता;9 बांधकामे पूर्ण

vishwatmaklokswamivarta

वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची ग्वाही