vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

विशेष वृत्त -जालना जिल्ह्यातील 34 रुग्णालये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत मागील तीन महिन्यात 76 रुग्णांना 56 लाख 75 हजार रुपयांची मदत…

विशेष वृत्त -जालना जिल्ह्यातील 34 रुग्णालये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत मागील तीन महिन्यात 76 रुग्णांना 56 लाख 75 हजार रुपयांची मदत…

 जालना प्रतिनिधी :- जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. वैद्यकीय मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नित जालना जिल्ह्यातील 34 रुग्णालयांचा समावेश आहे. तरी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातंर्गत 1 मे ते 30 जून 2025 पर्यंत जालना जिल्ह्यातील 76 रुग्णांना 56 लाख 75 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकिय अधिकारी डॉ. सोपान विक्रम चव्हाण यांनी दिली.

 

राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारावरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात असत. पंरतू नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या जालना येथे हा मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर कार्यरत आहे. या कक्षाचे प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ. सोपान विक्रम चव्हाण हे आहेत.

जालना जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, जालना मिशन हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय अंबड, दीपक मेडिकल फाऊंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर, जालना हॉस्पिटल ॲण्ड क्रिटीकल केअर, दीपक हॉस्पिटल, वरकड हॉस्पिटल, जालना हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, संजिवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, मान्टे मुंडे हॉस्पिटल, संत गाडगेबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, सरस्वती तेलूराम गोयल हार्ट केअर, शिंदे बाल रुग्णालय, ओम बाल रुग्णालय, आस्था हॉस्पिटल ॲण्ड आयसीयु, ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, जोशी ॲक्सिडेंट ॲण्ड जनरल हॉस्पिटल, वरद हॉस्पिटल ॲण्ड क्रिटीकेअर, मंत्री सर्जिकल ॲण्ड मॅटर्निटी हॉस्पिटल, वरकड हॉस्पिटल, जालना मिशन हॉस्पिटल, आस्था हॉस्पिटल ॲण्ड मॅटर्निटी हॉस्पिटल, नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, आरव्ही मेडिकेअर हर्ट ॲण्ड सुपर स्पेशालिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कलावती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, श्री राजुरेश्वर हॉस्पिटल, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आरंभ बाल रुग्णालय ॲण्ड हॉस्पिटल, शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, विरा मेडिसिटी हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल (कोड 6377) अशी एकुण 34 रुग्णालये संलग्नीत करण्यात आलेली आहेत

संबंधित पोस्ट

सासवड-जेजुरी भुयारी गटार प्रकल्पांना निधी देणार- उद्योग मंत्री उदय सामंत

बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा इफ्फी 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कारासाठी पंधरा चित्रपट स्पर्धेच्या रिंगणात

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदांच्या भरतीस वेग येणार अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी (दि.21)2025

vishwatmaklokswamivarta