vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सासवड-जेजुरी भुयारी गटार प्रकल्पांना निधी देणार- उद्योग मंत्री उदय सामंत

सासवड-जेजुरी भुयारी गटार प्रकल्पांना निधी देणार- उद्योग मंत्री उदय सामंत

मु राज्य प्रतिनिधी :- सासवड आणि जेजुरी नगरपरिषद क्षेत्रातील भुयारी गटार प्रकल्पांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य विजय शिवतारे यांनी सासवड आणि जेजुरी नगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटार प्रकल्प संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली.उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, सासवड नगरपरिषद क्षेत्रात भुयारी गटार योजनेच्या टप्पा एक मधील कामे मुदतवाढ देऊनही पूर्ण झाली नाहीत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल संबधित ठेकेदारास काळया यादीत टाकले जाईल. ही योजना पूर्ण करण्यासाठी नवीन निविदा काढून यासाठी आवश्यक असणारा २० कोटी निधी मंजूर करण्यात येईल.

सासवड आणि जेजुरी नगरपरिषदेत भुयारी गटारी योजनेच्या टप्पा २ मधील कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत नगरपरिषद व नगर विकास विभागास निर्देश दिले जातील. भुयारी गटार योजना टप्पा २ च्या कामासाठी आवश्यक असलेला निधीही उपलब्ध करून दिला जाईल. तसेच नदी प्रदूषण संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगरविकास विभागाला निर्देश देण्यात येतील,असेही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

जयपूर डायलॉग’ हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जयपूर डायलॉग डेक्कन समिट

vishwatmaklokswamivarta

रानभाज्यांना राजश्रय देऊन गडचिरोली ब्रँड निर्माण करण्याची गरज – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात रानभाज्यांचे संवर्धन व विपणनावर भर

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव

बीड जिल्ह्यातील भूसंपादन मावेजा वाटपाच्या गैरव्यवहारातील  ७३ कोटींची रक्कम वसूल करणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta