vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटनयेणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटनयेणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. केंद्र शासनाने आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचारात वापर, संशोधन अशा विविध प्रकारे चालना दिली असून येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 येथील सातार तांडा भागातील श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राजाचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, श्रीयश प्रतिष्ठानचे बसवराज मंगरुळे,सचिव संगिता मंगरुळे, रुग्णालय अधीक्षक डॉ. परेश देशमुख, अधिष्ठाता स्वाती इटगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्रारंभी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना श्री, फडणवीस यांनी संबोधित केले.

  ते म्हणाले की, भारतीय जीवनपद्धतीस अनुकूल व निसर्गाशी साधर्म्य सांगणारी ही उपचार पद्धती वेदांमध्ये आयुर्वेद या नावाने सांगण्यात आली आहे. आजाराच्या लक्षणांवर नव्हे तर मुळाशी जाऊन आयुर्वेदात उपचार केले जातात. ही उपचार पद्धती शाश्वत उपचार पद्धती आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीचा जगभरात वापर वाढत आहे. भारतात आयुर्वेद उपचार पद्धतीने उपचार घेण्यासाठी अनेक लोक पर्यटक म्हणून येत आहेत. आयुर्वेदाने या जगाला विज्ञान निष्ठ उपचार पद्धती देऊन शल्य चिकित्सा पद्धतीही दिली आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, कोविड काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पूरक औषधांमध्ये आयुर्वेदीक औषधींचा सर्वाधिक समावेश होता. केंद्र सरकारने या उपचार पद्धतीला चालना देण्याचे ठरविले असून त्यास अनेक प्रकारे चालना दिली जात आहे. त्याचाच एक भाग प्रशिक्षित वैद्य तयार करणे हे असून त्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयांना चालना दिली जात आहे. आगामी दशकात भारत हा जगातली प्रमुख अर्थव्यवस्था बनून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ पहात आहे. २०२४७ पर्यंत आपला देश आर्थिक महासत्ता झालेला असेल.आपला देश हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे. मराठवाड्यातही आपण उद्योगाला चालना देऊन इलेक्र्टिक व्हेईकलचे कॅपिटल म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

या सोहळ्यास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थांना पुरविण्यात येणार मोफत पाठ्यपुस्तके …

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवसमूह पुनर्विकास करावा

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह ! राज्यात ६० हून अधिक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..

vishwatmaklokswamivarta

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस