vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मंत्रालयात भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने ‘प्रिल्यूड परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. 

मंत्रालयात भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने ‘प्रिल्यूड परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई प्रतिनिधी-नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. एकात्मिक डिजिटल सेवा प्रणाली, ‘महा आयडी’, ‘महा एआय’ आणि ‘महाविस्तार’ या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. याविषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय होते. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या आयुक्त भुवनेश्वरी एस., राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक अमोद सूर्यवंशी आणि कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संचालक मीनल करनवाल यांच्यासह विषयतज्ज्ञांनी सहभाग घेतला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजात वापर करून नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यावर परिषदेत भर देण्यात आला.

नागरिकांना विविध शासकीय योजनांसाठी वारंवार नोंदणी, कागदपत्रे सादर करणे आणि कार्यालयांना भेटी देणे टाळता यावे, यासाठी एकात्मिक डिजिटल सेवा प्रणालीद्वारे पात्र योजनांची माहिती, सुलभ अर्जप्रक्रिया आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ‘महा आयडी’च्या माध्यमातून एकच प्रवेश व्यवस्था विकसित करणे, नैसर्गिक भाषेत संवाद साधून शासकीय सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करणे आणि पात्र नागरिकांना प्रमाणपत्रे स्वयंचलितपणे देण्याच्या शक्यता तपासणे, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत

शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, बाजारभाव, खतांचा योग्य वापर आणि शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर मिळावी, यासाठी ‘महाविस्तार’ उपक्रमाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. पिकांची स्थिती आणि पेरणीच्या कालावधीनुसार सल्ले देण्यासोबतच अतिवृष्टी, उष्णतेची लाट आणि वीज पडण्याच्या धोक्याबाबत सूचना देण्याची सुविधाही यामध्ये आहे.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पत्रलेखन, दस्तऐवजांचा सारांश, माहितीचे विश्लेषण आणि भाषांतर यांसारख्या कामांसाठी ‘महा एआय’ व्यासपीठाचा उपयोग करता येणार आहे. योजनांमधील दुबार नोंदी शोधणे आणि संशयास्पद माहिती ओळखणे यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करताना माहितीची गोपनीयता, सुरक्षितता, विश्वासार्हता आणि सर्वसमावेशक सेवा वितरण यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता परिषदेत अधोरेखित करण्यात आली.

परिषदेत विविध शासकीय विभागांचे अधिकारी, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि निमंत्रित सहभागी झाले. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे मान्यवरांनी निरसन केले.

संबंधित पोस्ट

सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशासनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स 00000

चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· चाकणमध्ये १,४०० कोटींची तर; हिंजवडीसाठी ४२६.५४ कोटींची कामे प्रस्तावित

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात नियोजनबद्ध विकास आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर पालकमंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

मुंबईकरांसाठी खूशखबर!बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जलतरण तलाव १६ ऑगस्टपासून पुन्हा सुरू…

बालकांना पोषणासह चविष्ट आहार; घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश – मंत्री आदिती तटकरे