vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे.

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे

विशेष प्रतिनिधी-दरवर्षीप्रमाणे 8 मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा करण्यांत येतो. या दिवशी थॅलेसेमिया आजाराची समाजामध्ये माहिती, जनजागृती व्हावी हा दृष्टीकोनातुन मार्गदर्शन करण्यांत येतो. थॅलेसेमिया हा आजार रक्ताशी संबंधीत आहे. या वर्षीची थीम ’आता लपुन न राहताः निदान न झालेल्या रुग्णांना शोधणे. दुर्लक्षित रुग्णांना आधार देणे’ “Hidden No More: Finding the Undiagnosed. Supporting the Unseen.” याची आपण अमंलबजावणी 100 टक्के केली तर निश्चितचं एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे असणारं

 थॅलेसेमिया हा आजार अनुवांशिक आहे. कारण पालकांकडुन मुलांना हा आजार होतो. सामान्य मानवाच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींचे आयुष्य 120 दिवस असते. थॅलेसेमिया या आजारामध्ये लाल रक्त पेशींचे आयुष्य 20 ते 22 दिवस असते. त्यामुळे थॅलेसेमिया ग्रस्त मुलांचे हिमोग्लोबीन कमी होत असल्यामुळे त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. हिमोग्लोबीन कमी होत असल्यामुळे थॅलेसेमिया हा धोकादायक आजार आहे. या आजारापासुन मुक्त होण्यसाठी लस किंवा औषधी उपलब्ध नाही. भारतामध्ये अंदाजे १ लाख थॅलेसेमिया रुग्ण असुन दरवर्षी 1000 रुग्णांची वाढ होतलक्षणे : अशक्तपणा, थकवा, नखे, डोळे व जीभ फिकट होणे, त्वचेवर पिवळसर रंग येणे, शारीरिक वाढ मंदावणे, ओटीपोटीत दुखणे.

प्रकार : थॅलेसेमिया या आजाराचे दोन प्रकार मेजर व मायनर आहेत. मेजर या प्रकारामध्ये पती पत्नी या दोघांच्याही गुणसुत्रामध्ये दोष असतो. मायनर या प्रकारामध्ये पती किंवा पत्नी या दोघापैकी एकाच्या गुणसुत्रामध्ये दोष असतो. पालकांच्या गुणसुत्रातील दोषामुळे थॅलेसेमिया हा आजार होतो. याचे रोग निदान रक्त तपासणीद्वारे होते.

उपचार : बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव खर्चिक उपचार आहे किंवा नियमित 20 ते 25 दिवसांनी बालकांना बाहेरुन रक्त देणे. तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित उपचार घेणे.

आवाहन : वेळेवर निदान, उपचार आणि प्रतिबंध या त्रिसुत्रीचा वापर करण्यासाठी जनजागृती करु या.डॉ. जयश्री भुसारे)  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालन

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी९७०.४२ कोटीच्या खर्चास मान्यताशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

नवी मुंबई महानगरपालिकेचे 366.80 कोटींचे विक्रमी करसंकलन ! कर संकलनात योगदान देणाऱ्या करदात्यांचे महापालिकेकडून आभार; 1 जुलैपासून विलंब दंड लागू!

सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

आता स्वयंचलित दरवाज्यांसह मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घेतले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन…

vishwatmaklokswamivarta

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज साधणार शेतकरी, कामगारांशी संवाद*