vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन दि. २३ मे २०२६ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार

शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन दि. २३ मे २०२६ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार

शिर्डी प्रतिनिधी-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या दूरदर्शी संकल्पनांना बळ देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन दि. २३ मे २०२६ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी निबे उद्योग समूहाचे प्रमुख गणेश निबे यांच्या समवेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिर्डी औद्योगिक वसाहतीत निबे समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेले डिफेन्स क्लस्टर हे भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे सांगितले. अत्यावश्यक संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसाठी अत्याधुनिक उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प साकारत आहे.

शिर्डीची भूमी ही भक्ती व शक्तीचा अद्वितीय संगम आहे. एका बाजूला श्री साईबाबांचा श्रद्धा व सबुरीचा संदेश, तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे, याचा विशेष आनंद वाटतो.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सुमारे ३ हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. हा प्रकल्प शिर्डीत साकारण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

00000

संबंधित पोस्ट

वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मिळालेल्या वाहनांचे लोकार्पणपोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर  – पालकमंत्री शंभूराज देसाई

आकाशवाणीच्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्राच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉन सह विविध कार्यक्रमांचं आयोजन

महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; एकदा जमीन विकली काय म्हणाले राज ठाकरे? भाषा संपली तर… रायगडवासियांना राज ठाकरेंचं आवाहन

वंदे भारत एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत…

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…