vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी–जिल्ह्यातील सर्व अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इमाव, आर्थिक मागास वर्ग प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी Revert Black केलेले अर्ज फेरसादर केले नाहीत त्यांनी दि.10 जून 2025 पर्यंत त्रुटीची पूर्तता करुन अर्ज फेरसादर करावेत अन्यथा त्यांचे अर्ज बाद होतील.

विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2025- 26 करीता शासकीय वसतीगृह प्रवेश दि.11 जून 2025 पासून सुरु असून इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता पोर्टल सुरु करण्यात येणार आहे.

अर्जाची प्रिंट प्रत 1000 मुलांचे शासयकीय वसतीगृह, किलेअर्क येथे व विद्यार्थींनीनी अर्जांची प्रिंटप्रत 1000 मुलींचे शासकीय वसतीगृह, युनिट – 4, सौभाग्य मंगल कार्यालय,एन – 11, द्वाराक नगर येथे सादर करावे, व गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंटप्रत गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह (नवीन), रेल्वे स्टेशन रोड येथे सादर करावे. व गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृहासाठी भरलेल्या अर्जांची प्रिंटप्रत गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृह (नवीन), पद्मपुरा येथे सादर करणे आवश्यक राहील. तालुका स्तरावरील अर्जांची प्रिंटप्रत तालुकास्तरावरील वसतीगृहात सादर करणे. असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

गृहपाल अतिश ससाने, मो.क्रं. 9527356486, 1000 मुलांचे शासकीय वसतीगृह Unit – 1 किलेअर्क,गृहपाल संजय पवार, मो.क्रं. 9096834776, 1000 मुलांचे शासकीय वसतीगृह Unit – 2 किलेअर्क,

गृहपाल आझाद शेजुळ मो.क्रं.9975434850, गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह (नवीन),

गृहपाल श्रीमती वैशाली बागल मो.क्रं.9923795054, गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह (नवीन) पद्मपुरा,गृहपाल श्रीमती करुणा घनसावंत मो.क्र.1000 मुलींचे शासकीय वसतीगृहृ, युनिट -4,

000000

संबंधित पोस्ट

एफएसएसएआयने राज्यांना फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे केले आवाहन.एफएसएसएआयने फळांच्या कृत्रिम पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर आणली बंदी..

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना”ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधारसांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया;पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

माथेरानमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती!

सीएससी सेंटर चालविण्यास इच्छुक माजी सैनिकांना30 जानेवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा- मंत्री डॉ. अशोक वुईके