vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेश प्रक्रिया सुरू…

गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेश प्रक्रिया सुरू…

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज हे कार्यरत आहे. सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी, ITI-I तसेच Diploma-I या वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी 0233-2990177 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रवेश अट व प्रक्रिया – विद्यार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्याला किमान 55 टक्के गुण असावे. विद्यार्थी सांगली मिरज व कुवाड शहरातील रहिवासी असावा. विद्यार्थी इयत्ता 11 वी, ITI-I तसेच Diploma-I या वर्गातीलच असावा. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचा आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जासोबत 10 वी गुणपत्रक, शाळा सोडलेला दाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, महाविद्यालयातील फी भरलेली पावती/बोनाफाईड, एसबीआय बँक अकाउंट, गॅप सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडून वसतिगृहामध्ये जमा करावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

बालविवाहमुक्त अभियानात ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

महाडच्या हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी !हुतात्मा कमलाकर दांडेकर यांच्या नावाने स्मारक ओळखले जाणार; महाडच्या हुतात्मा दिनाचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी कॅबिनेटमध्ये विषय मांडणार : पालकमंत्री भरतशेठ गोगावले

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!*_*मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!*

vishwatmaklokswamivarta

सैनिक कल्याण पुणे विभागात माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक पदांची भरती…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश 

उपमुख्यमंत्री कार्यालय ( जनसंपर्क कक्ष)अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त