vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग घेण्याकरीता जाहीर शिबीरांचे आयोजन*

*मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग घेण्याकरीता जाहीर शिबीरांचे आयोजन*

 

   नवी मुंबई प्रतिनिधी-  सद्यस्थितीत अवकाळी पाऊस येत – जात आहे. हे वातावरण हिवताप / डेंग्यूसारखे आजार पसरविणाऱ्या डासांसाठी पोषक आहे. हिवताप / डेंग्यू सारखे आजार पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे घरांतर्गत व घराभोवताली स्वच्छ साचलेल्या पाण्यामधील स्थानांमध्ये होत असते, त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आरोग्य विभागाच्या वतीने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे.

v हिवताप / डेंग्यू आजाराची कारणे -· ‍हिवताप / डेंग्यू हे किटकजन्य आजार आहेत.· हिवताप आजार हा संक्रमित ॲनाफिलीस या डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होतो.· डेंग्यू आजार हा संक्रमित एडिस एजिप्ताय या डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होतोv हिवताप / डेंग्यू चा प्रसार –· हिवताप / डेंग्यू संक्रमित डासाची मादी निरोगी व्यक्तीस चावल्यास हिवताप / डेंग्यू आजाराची लागण व त्याचा प्रसार होतो.

v आजाराची लक्षणे –हिवताप डेंग्यू थंडी वाजून ताप येतो. ताप थोडा वेळ टिकतो. · ताप कमी होताना भरपूर घाम येऊन उतरतो.· ताप सहसा एक दिवसाआड येतो.· तापाबरोबर डोकेदुखी अंगदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, थकवा जाणवतोजाणवतोl

एकाएकी तीव्र ताप येणे.· तीव्र डोकेदुखी स्नायूदुखी, सांधेदुखी व उलट्या होणे.· दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी. तोंडाला कोरड पडणे.· ताप कमी जास्त होणे. अंगावर पुरळ येणे.v ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्ती स्थाने–

ॲनॉफीलीस व एडीस डास हे स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतात व त्यातून 8 ते 10 दिवसात डासांचा जन्म होतो.

      त्यांची उत्पत्ती स्थाने : घरातील व घराबाहेरील झाडांच्या कुंड्यांच्या खालील प्लेटमधील पाणी. झाकण नसलेली पाणी साठविण्याची भांडी, घरातील फेंगशुई, अथवा शोभेच्या झाडांमध्ये साचलेले पाणी.· गॅलेरीत / गच्चीवर, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे.· उघड्यावरील टायर्स.· छतावरील प्लास्टिक कागद/ताडपत्री मधील पाणी· बांधकामाच्या ठिकाणी जमा पाणी· झाकण नसलेले ड्रम व पाण्याच्या टाक्या इ.

v महानगरपालिकेमार्फत नियमित कार्यवाही –      डासांनी अंडी घातल्यापासुन डास जन्म घेईपर्यंत 8-10 दिवसांचा कालावधी लागतो. हे चक्र मध्येच तोडण्यासाठी व डासउत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी साप्ताहिक कार्यक्रम राबविण्यात येतो.· महानगरपालिकेमार्फत साप्ताहिक वेळापत्रकानुसार डास/अळी नाशक फवारणी कार्यक्रम. साप्ताहिक वेळापत्रकानुसार बंद गटारात रासायनिक धूरीकरण कार्यक्रम.

· घरांतर्गत डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येते, त्यामध्ये डासअळ्या आढळल्यास त्या अळ्या नागरिकांना दाखवून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते.

· प्रत्येक हिवताप / डेंग्यू रुग्णांच्या सभोवतालच्या 100 घरांमध्ये डासअळ्या शोधणे, पावडर फवारणी करणे, तापाच्या रुग्णांचा सर्वेक्षण करुन रक्त नमुने घेणे इ. कार्यवाही करण्यात येते. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कार्यक्षेत्रात गृहभेटी देऊन प्रत्येक तापाच्या रुग्णाचा रक्तनमुना घेऊन मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार देण्यात येतो. · महानगरपालिकेच्या रुग्णालयात किंवा ना.प्रा.आ केंद्रात येणाऱ्या प्रत्येक तापाचा रुग्णांचा रक्तनमुना घेऊन उपचार देण्यात येतो.

· महापालिका आयुक्त

संबंधित पोस्ट

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाचा लाभ घ्या- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम- अभियानात दिनांक 20 सप्टेंबरअखेर 3 हजार 148 रूग्णांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबवावी –मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

vishwatmaklokswamivarta

जन आरोग्य योजना सर्वांसाठीच ठरणार जीवनदायी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात जागतिक कर्करोग दिवस साजरा

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध अभियान…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व पल्स पोलिओ मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये आवाहन-साडेचार लाख मुलांना मिळणार जंतनाशक गोळ्या

vishwatmaklokswamivarta