vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन 

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन

 

जालना, प्रतिनिधी:- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रस्तरावर दि. 9 एप्रिलपासून 8 वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बालकाचा शारीरिक विकासासोबतच मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी कुटुंब आणि समुदायामध्ये योग्य पद्धतींचा सराव व्हावा, हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. दि. 23 एप्रिल 2026 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आणि लाभार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यंदाचा पोषण पंधरवडा १). माता व बालकाचे पोषण: गरोदर माता आणि बालकांच्या आहाराबाबत मार्गदर्शन. २). मेंदू विकास (० ते ३ वर्षे): लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पूर्व उद्दीपन. ३). खेळातून शिक्षण (३ ते ६ वर्षे): मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण. ४). स्क्रीन टाइमवर नियंत्रण: मुलांचे मोबाईल व टीव्हीचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांची भूमिका. ५). सक्षम अंगणवाडी: अंगणवाडी केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग वाढवणे. या विषयावर प्रामुख्याने आधारित असेल. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारताने पहिले स्वदेशी प्रतिजैविक “नॅफिथ्रोमायसिन” विकसित केले, जे प्रतिरोधक श्वसन संसर्गाविरुद्ध प्रभावी आहे, विशेषतः कर्करोग आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे

vishwatmaklokswamivarta

आरोग्य विभागाची गरुडझेप : २८ बालकांना थॅलेसिमियामुक्त नवजीवन!जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त ‘एचएलए’ तपासणी शिबिर 

जिल्हा रुग्णालयात #हृदयरोग निदान व #आरोग्यशिबीर संपन्न शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया                                                                                  

vishwatmaklokswamivarta

एचआयव्ही नियंत्रणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार

vishwatmaklokswamivarta

जागतिक लोकसंख्या दिन : सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात .