vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

 

मुंबई, प्रतिनिधी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, “त्याग, श्रद्धा, समर्पण या उदात्त मूल्यांची शिकवण देणारा ‘ईद-उल-अज़हा’चा सण समाजात एकता, शांतता, बंधुता, सौहार्द वाढवणारा आहे. हा सण एकमेकांशी प्रेम, सहकार्य, आपुलकीची भावना दृढ करणारा असून, समाजातील वंचित, गरजू, उपेक्षित घटकांप्रती आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा आहे. या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो,” अशी सदिच्छा व्यक्त करत, एकात्मता, सहिष्णुता आणि परस्पर सन्मानाच्या मूल्यांना अनुसरून सामाजिक सलोखा दृढ करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा राज्यपालांच्या हस्ते ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२६’चे वितरण

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे दि.२२ रोजी लोकअदालत

मुलुंडमध्ये मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला, ऑटोवर ढिगारा पडल्याने ३-४ जण जखमी झाल्याचा संशय एकाचा मृत्यू झाल्याची वृत्त

vishwatmaklokswamivarta

लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

भाजप जालना महानगर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल भास्कर आबा दानवे यांचा माजी मंत्री तथा जालना विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार