vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री कार्यालय ( जनसंपर्क कक्ष)अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

उपमुख्यमंत्री कार्यालय ( जनसंपर्क कक्ष)अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

मुंबई, प्रतिनिधी: आज दुपारी गुजरातमध्ये घडलेला भीषण विमान अपघात अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघाताच्या दुर्घटनास्थळावरून जे दृश्य समोर येत आहे, ते पाहून काळजाचं पाणी होतं. या अपघातात विमानातील दोन महाराष्ट्रीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्या सर्व प्रवाशांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

ज्या परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढवला आहे. मी माझी सहवेदनाही व्यक्त करतो. त्यांच्या दुःखात महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सहभागी आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, गुजरात शासन, केंद्र आणि राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी तत्परतेने बचावकार्य सुरू केले आहे. या अपघातातील जखमी प्रवाशांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्या सर्वांना उत्तम उपचार मिळावेत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

या अपघातामुळे अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात केवळ जीवितहानीच नव्हे, तर मोठं नुकसान झालं आहे. अनेक नागरिकांचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं आहे. विमान कोसळलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली होती, जी विझवण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे.

या कठीण प्रसंगी आम्ही सगळे गुजरात शासनासोबत असून महाराष्ट्र शासन आवश्यक ती सर्व मदत करेल आपत्तीच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मदतीचा हात देणं आवश्यक आहे. या दु:खद घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखावर मात करण्याची शक्ती लाभो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचेमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

दिव्यांगांनी त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखवून सकारात्मकतेने जीवन जगावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्राचे वितरण

vishwatmaklokswamivarta

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस

vishwatmaklokswamivarta

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,· तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू

भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत #स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta