vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड द प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निर्गमीत केले आहेत.

या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक, तहसिल कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेध महाविद्यालय तथा शासकीय वैद्यकीय रुग्णालय वजीराबाद नांदेड पर्यंतच्या परिसरातील शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 29 एप्रिल 2026 रोजीचे 24.00 वाजेपासून ते 2 मे 2026 च्या 00.00 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.

संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची-प्रभावी अंमलबजावणी करावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन शेतमाल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करावे – पणन मंत्री जयकुमार रावल “मॅग्नेट“ची १८ व्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक

संत ज्ञानेश्वर उद्यान दि.२६ पर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करावे- खा.संदिपान भुमरे

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta