vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत  ‘श्री राजमातंगी महायज्ञ’१७ मे या दिवशी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागील नर्दुल्ला टँक मैदानात दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत यज्ञसोहळा चे आयोजन

भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत  ‘श्री राजमातंगी महायज्ञ’१७ मे या दिवशी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागील नर्दुल्ला टँक मैदानात दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत यज्ञसोहळा चे आयोजन

 राज्य प्रतिनिधी-

संपूर्ण जगावर सध्या तिसर्‍या महायुद्धाचे काळे ढग दाटले असतांना केवळ राजकीय किंवा बौद्धिक स्तरावरील प्रयत्न पुरेसे नाहीत. राष्ट्राला आध्यात्मिक अधिष्ठानाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. याच उदात्त हेतूने भारताला अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे आणि देशाची सर्वांगीण प्रगती होऊन पुन्हा एकदा ‘रामराज्या’चा उदय व्हावा, या संकल्पपूर्तीसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे.

१७ मे या दिवशी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागील नर्दुल्ला टँक मैदानात दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत यज्ञसोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी  पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, पुरोहित आणि ज्योतिर्विद श्री. श्रेयस पिसोळकर अन् महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नवी मुंबई समन्वयक श्री. कैलास पाटील उपस्थित होते. हा महायज्ञ केवळ धार्मिक विधी नसून तो राष्ट्ररक्षणाचा आध्यात्मिक लढा असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले. सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

संबंधित पोस्ट

रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींवर तात्काळ उपचार ; १०२ आणि १०८ रुग्णवाहिकांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण …

मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने ज्ञान आकलन क्षमता वाढते- जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड

vishwatmaklokswamivarta

योगाभ्यासातून शिक्षित, सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक घडविणे आजची गरज – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रतिपादन  > बुलढाण्यात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा > २५०० योगप्रेमींचा सहभाग 

कोंकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन,विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न-पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

लेख – १ जुलै : राज्य कृषी दिन-हरित क्रांतीचे जनक – वसंतराव नाईक

वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta