vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कोंकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन,विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न-पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव

कोंकण विभाग स्तरावरील प्रजासत्ताक दिन,विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न-पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव

 

       नवी मुंबई, प्रतिनिधी  :- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 76 वा वर्धापन दिनाचा कोकण विभाग स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज कोकण विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-17, कळंबोली येथे हा कार्यक्रम साजरा करण्यातv आला. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आणि शालेय विद्यार्थी आदींना विभागीय आयुक्तांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, पोलीस सह आयुक्त एस.डी. एनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.   यावेळी परेड कमांडर गजानन राठोड, राखीव पोलीस मुख्यालय नवी मुंबई, एस.आर.पी.एफ,ग्रुप नं.11 प्लाटून, क्यु .आर.टी.पथक, नवी मुंबई, आर.सी.पी.पथक, नवी मुंबई, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई वाहतूक पोलीस पथक, डॉग स्कॉड बॉम्ब शोधक/नाशक पथक, बँड पथक, वरुन वाहन, वज्रवाहन, निर्भया पथक इरटिगा, फायर बुलेट, निर्भया पथक ॲक्टीव्हा, अग्निशामक रेस्क्यु व्हॅन सिडको आदीनी विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेले कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे,नवी मुंबई पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे सहायक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, कळंबोली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे यांना विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय राज्यघटनेबाबत तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी राज्यात “घर घर संविधान” हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण,मुंबई विभागाचे बाळासाहेब सोळंकी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेची फोटो फ्रेम प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित मान्यवारांना दिली .

या कार्यक्रम प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागतर्फे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.2 दिवाळे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.06 करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.112 करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.15 शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.102 नेरुळ, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.101 शिरवणे या सहा शाळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रोत्साहन दिले.

  या कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग विकास पानसरे, अपर आयुक्त (महसूल) नितीन महाजन, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन)/(करमणूक शुल्क) संजीव पलांडे, सह आयुक्त(पुनर्वसन)अमोल यादव, सह आयुक्त(रोहयो) एकनाथ नवले, उप आयुक्त (विकास आस्थापना) श्रीम.मिनल कुटे, उप आयुक्त विकास डॉ.प्रदिप घोरपडे, उप आयुक्त नियोजन प्रमोद कें

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकुटुंब कुंभस्नान वाराणसीत काशी विश्वेश्वराचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे येथे २४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून पदोन्नत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा..

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. तरडगाव व फलटण येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.चित्ररथाचे विशेष आकर्षण

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम आझाद मैदानावर

vishwatmaklokswamivarta

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणीकांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

vishwatmaklokswamivarta