vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने ज्ञान आकलन क्षमता वाढते- जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड

मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने ज्ञान आकलन क्षमता वाढते- जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड

सातारा, प्रतिनिधी मातृभाषेतून शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे ज्ञान आकलनाची क्षमता वाढते आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर तहसीलदार सर्वसाधारण चंद्रकांत शितोळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थ्याला विविध परीक्षांना सामोरे जावे लागते, असे सांगून श्री. गव्हाड म्हणाले की, या परीक्षांना आत्मविश्वासाने तोंड देण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण मोलाचे ठरते. शिक्षकांनीही वर्गात विचारमंथन करताना मातृभाषेचाच अधिक वापर केला पाहिजे.

यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे म्हणाले, जे विद्यार्थी मातृभाषेतून शिक्षण घेतात ते कोणत्याही स्पर्धेत उत्तम प्रकारे टिकून राहतात हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी विविध साहित्य व ग्रंथांचे अवांतर वाचन केले पाहिजे. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतून चर्चासत्रांचे आयोजन करावे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखाधिकारी शीतल करंजेकर यांनी केले.

0000

 

संबंधित पोस्ट

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला अनुमती नाकारली;हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !दहशतवादाचे समर्थन करणारे असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती

स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुविधा-कौशल्य विकास केंद्रातर्फे विनामूल्य अभ्यासिका

vishwatmaklokswamivarta

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025  मंगळवारी साप्ताहिक बाजार राहणार बंद

vishwatmaklokswamivarta

म्हैसाळ उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज..त्वरित भरून द्यावेत…

vishwatmaklokswamivarta

राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफीयांकडून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी-एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta