vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात नदीपात्रात मृत कोंबड्या टाकणाऱ्या अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल.

रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात नदीपात्रात मृत कोंबड्या टाकणाऱ्या अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल

जालना प्रतिनिधी: शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत कोंबड्या टाकून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालना महानगरपालिकेतील प्रभारी स्वच्छता निरीक्षक मॅथ्यु वर्गीस चाको (वय 45) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 7 मे 2026 रोजी रामतीर्थ स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रात पिकअप वाहन क्रमांक एमएच 21 बीएच 9742 मधून अंदाजे 100 ते 125 मृत कोंबड्या आणून टाकल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच संसर्गजन्य रोग फैलावण्याची शक्यता निर्माण झाले. तसेच नदीपात्रात मृत कोंबड्या टाकून सार्वजनिक पाणी स्रोतात प्रदूषण करुन वातावरण आरोग्यास धोका निर्माण केल्याचा आरोप संबंधीतावर करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 271, 272, 279, 280, आणि 291 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. श्री. जाधव करीत असल्यचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.0000

संबंधित पोस्ट

हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला ​​अटक; लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप..

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

vishwatmaklokswamivarta

रेल्वे स्टेशन चौक परिसरातील अज्ञात मृत व्यक्तीच्या वारसांचा शोध; ओळख पटविण्यासाठी आवाहन

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

बोगस कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई – अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली