vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ४४९० नागरिकांची तपासणी; २३७ संशयित रुग्णांची नोंद…

ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ४४९० नागरिकांची तपासणी; २३७ संशयित रुग्णांची नोंद…

आरोग्य प्रतिनिधी ठाणे – ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व सहजसुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कर्करोग मोबाइल व्हॅन कार्यरत असून, नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत आहे.    जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्हॅनचे प्रभावीपणे संचालन केले जात आहे.

 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोबाइल व्हॅनद्वारे मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग यांसारख्या प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जात आहे. ही व्हॅन आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात न जाता त्यांच्या परिसरातच ही सेवा मिळते.

   फेब्रुवारी २०२५ व मे २०२५ या दोन महिन्यातील कालावधीत एकूण ४४९० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये २३७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले आहे.

   कर्करोग हा असंसर्गजन्य आजार असून त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परंतु वेळीच निदान झाल्यास योग्य उपचाराद्वारे रुग्णाचे आयुष्य वाचवता येते. याकरिता कर्करोग मोबाइल व्हॅन उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

000

संबंधित पोस्ट

जागतिक कावीळ दिनानिमित्त जालना शहरात जनजागृती रॅली

इन्फ्लूएन्झाबाबत भीती नको, सतर्कता बाळगा आणि योग्य काळजी घ्या – नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

vishwatmaklokswamivarta

आरोग्य – सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार – डॉ. स्वानंद सोनारजिल्ह्यातील ६८ स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठकनिरामय अहिल्यानगर अभियान’वर सविस्तर चर्चा

समुदाय स्तरावरील उद्दिष्टे, कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन काम करावे – सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या अंमलबजावणीची राज्यस्तरीय पाहणी,राज्य समन्वयक अमोल पाटील यांची खामगाव तालुक्यातील विविध आरोग्य संस्थांना भेट; अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा घेतला आढावा