vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अनुसूचित जातीसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण*’बार्टी’ आणि ‘एमसीईडी’चा संयुक्त उपक्रम

अनुसूचित जातीसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण*’बार्टी’ आणि ‘एमसीईडी’चा संयुक्त उपक्रम

 

    अमरावती, प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा रोजगार सुरू करता यावा, या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

    या उपक्रमांतर्गत किमान दहावी पास उमेदवारांसाठी 1 महिना कालावधीचा डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी 2 महिने कालावधीचा अप्लाईड आर्टीफिशिअल इंटेलिजेंस विथ एम्फासिक ऑन रोबोटीक्स आणि आयओटी हे दोन कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात अभियांत्रिकी, एसीए, बीसीए आणि बीएससी पदवीधर यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

     प्रशिक्षणात उद्योजकीय कौशल्याचे प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. यात उद्योग उभारणी, शासकीय कर्ज योजना आणि अनुदानाची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, विक्री कला आणि उद्योग व्यवस्थापन, तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रत्यक्ष भेटी आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी वय 18 ते 45 वर्षे, उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, राज्याचा गेल्या 15 वर्षांपासूनचा रहिवासी असावा लागणार आहे. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

    प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि रहिवासी दाखला जोडणे अनिवार्य आहे. याबाबत अधिक माहितीसाठी गणेश बहाड, ९४०५४३५७३१ यांच्याशी 1 महिन्याच्या कोर्ससाठी, तर 2 महिन्यांच्या कोर्ससाठी स्वप्नील इसळ, ८७८८६०४२२६, राजेश सुने ९१६८६६७१५४ यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुक उमेदवारांनी mced.co.in/Barti यावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीच्या प्रकल्प अधिकारी अनिता गवई आणि एमसीईडीचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

महाविकास आघाडीला मोठा धक्का! माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश 

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

महसूल वसुली पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

जळगाव जामोद नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे गणेश दांडगे विजयी भाजपचे ९, काँग्रेसचे ५ सदस्य

vishwatmaklokswamivarta

एनकेएसपीटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगतर्फे ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन