vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबई, प्रतिनिधी : शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरणारे अन्नपदार्थ; तसेच कॅफिनयुक्त पेयांची विक्री आढळून आल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.

स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सदस्य विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवाळ बोलत होते. यावेळी सदस्य राहुल कुल आणि वरुण सरदेसाई यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री झिरवाळ म्हणाले की, शाळांच्या आवारात व परिसरात बालकांच्या आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांची विक्री होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची विक्री आढळल्यास त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्याबाबत पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच जिल्हा परिषदांना सूचित करण्यात आले असून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

राज्यात अन्न व औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी सध्या संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई येथे तीन प्रयोगशाळा कार्यरत आहेत. याशिवाय रायगड, नाशिक, यवतमाळ आणि पुणे येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर आणखी २२ प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे अन्ननमुने तपासणीची प्रक्रिया अधिक वेगवान होईल, असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.

मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, एप्रिल २०२५ ते मे २०२६ या कालावधीत स्टिंग एनर्जी ड्रिंकचे २७ अन्ननमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून त्यापैकी १० नमुने प्रमाणित घोषित करण्यात आले आहेत. तसेच एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत विविध एनर्जी ड्रिंकचे ११५ अन्ननमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी ६३ नमुने प्रमाणित, एक नमुना कमी दर्जाचा आणि सहा नमुने मिथ्याछाप घोषित करण्यात आले असून उर्वरित नमुन्यांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

0000

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी मानधन योजनेच्यालाभासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे         

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*  

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

महाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील३७२ क्रीडापटूंचे शासकीय सेवेत थेट समावेशन,सांगलीत अखिल भारतीय कनॉईंग, कयाकिंग स्पर्धांचे उत्साही उद्घाटन

जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्स’च्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन