vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील घटनेची आयोगाकडून गंभीर दखल; अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची वसतीगृहाला भेट

संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील घटनेची आयोगाकडून गंभीर दखल; अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची वसतीगृहाला भेट

 

राज्य प्रतिनिधी-बुलडाणा,: येथील संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात काही दिवसापूर्वी घडलेल्या अनुचित प्रकाराची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली असून त्याअनुषंगाने आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम हे सोमवारी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली.

भेटीदरम्यान वसतिगृह व शाळेची पाहणी करुन तेथील सुधारणाविषयी सूचना केल्या. यामध्ये वसतिगृहातील दस्तावेजाचे अद्यावतीकरण, पिण्याचे पाणी, शौचालयातील सुविधा, बेडची व्यवस्था, टिनशेड आदी पायाभुत सुविधा तातडीने पुरविण्याचे निर्देश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिल्‍याचे त्यांनी सांगितले.

बुलढाणा नगरपालिकेतील विविध विषयांचा घेतला आढावा,दरम्यान बुलढाणा नगरपरिषदेतील कामकाजाचा आढावा घेताना आयोगाचे उपाध्यक्ष श्री. मेश्राम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेचा आढावा घेतला. या योजनेतून दोन वाचलनालयामध्ये एका आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचे पुस्तके खरेदी केल्याचे निर्देशनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची समाजकल्याण अमरावती विभागाचे उपायुक्त यांनी स्व:त चौकशी करुन तपशिलवार अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे सूचना दिल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष श्री. मेश्राम यांनी दिली.

नगरपालिकांतर्गत अनुसूचित जातीच्या वर्गासाठी असलेल्या निधीचा विनियोगाचा अपव्यय होत असल्याचे आढळून आले. तसेच स्मशानभुमीच्या कामातील अनियमिततेची चौकशी सहायक आयुक्त समाजकल्याण व बुलढाणा नगरपालिका मुख्यधिकारी यांनी तातडीने करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

 

00000

संबंधित पोस्ट

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

महिला व बालविका स मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन

पाण्याविषयक तक्रारी 1800222309 टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याचे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचे आवाहन

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान राज्याच्या क्रीडा विकासासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार उद‌्घाटन- मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळले, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर कोणताही हिंसाचार खपवून न घेण्याच्या पोलिस प्रशासन आणि सशस्त्र दलांना सूचना.