vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अनाथ तसेच दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचारी यांसह अनेक विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना रक्षाबंधन निमित्त त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा व भेटवस्तू दिल्या.

अनाथ तसेच दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचारी यांसह अनेक विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना रक्षाबंधन निमित्त त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा व भेटवस्तू दिल्या.

मुंबई प्रतिनिधी –

अनाथ तसेच #दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचारी यांसह अनेक विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेऊन #रक्षाबंधन निमित्त त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा व भेटवस्तू दिल्या.

रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला व मुलींसह यंदाचे रक्षाबंधन केल्याचा अतिशय आनंद झाला आहे, अशी भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी दिवंगत सिंधुताई सपकाळ यांनी सुरु केलेल्या ममता बाल सदन या संस्थेच्या वतीने अनाथ मुली, पालघर जिल्ह्यातील ‘सेवा विवेक’ ग्राम विकास केंद्राच्या वतीने बांबू उत्पादनाच्या माध्यमातून स्वयंरोजगारीत आदिवासी महिला तसेच ब्रह्माकुमारी संस्थेच्या नेपियन सी केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी रुक्मिणी यांच्यासह ब्रह्माकुमारी बंधू भगिनींनी राज्यपालांना राखी बांधली तसेच दिव्य संदेश दिला. आर्य समाज माटुंगा येथील शालेय विद्यार्थिनी आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेतर्फे दृष्टिहीन मुलींनी राज्यपालांना राखी बांधली.

संबंधित पोस्ट

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये ‘वॉर्ड बाल संरक्षण समिती’ स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण

vishwatmaklokswamivarta

आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वनमंत्री  यांच्या अध्यक्षतेखाली,वन विभागाच्या विविध विषयांवर आढावा बैठक संपन्न,जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत..-वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta