vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ* *१ एप्रिलपासून नवे दर लागू*

*जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ* *१ एप्रिलपासून नवे दर लागू*

 

अलिबाग प्रतिनिधी: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांच्या (परिचलन पद्धतीने) पार पडलेल्या बैठकीत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदर वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ दि. १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार असून, वाहनचालकांना लवकरात लवकर मीटर रिकॅलिब्रेशन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवे भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत.

मीटर टॅक्सी (CNG) प्रति किलोमीटर भाडे १८.६६ रूपये वरून २०.६६ रूपये करण्यात आले आहे. तसेच किमान १.५ कि.मी. साठीचे भाडे २८ रूपये

वरून ३१ रूपये करण्यात आले आहे.ऑटोरिक्षा (CNG) प्रति किलोमीटर भाडे १५.३३ रूपयेवरून १७.१४ रूपये करण्यात आले आहे. तसेच किमान १.५ कि.मी. साठीचे भाडे २३ रूपये वरून २६ रूपयेकरण्यात आले आहे.प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवानाधारक आणि वाहनचालकांना आपल्या वाहनांचे मीटर त्वरित रिकॅलिब्रेशन करून घेण्याची सूचना दिली आहे. भाडेवाढ लागू झाल्यानंतर प्रवाशांनीही अद्ययावत दरानुसारच भाडे देण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे.अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

vishwatmaklokswamivarta

योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशनचे काम कालबद्धरित्या पूर्ण करा- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना विभागाचा घेतला आढावा…

अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी सावळी येथे 29 जुलैला व्यवहारिक मराठी भाषा पाठ्यक्रम कार्यशाळा

मुलांनो, बापाचे मालक होऊ नका’   परळी आगाराच्या वाहकाचा सल्ला सोशल मीडियावर होतोय व्हायरल…

🏥💙 *महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण**