vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, प्रतिनिधी : योगाला पूर्वापार चालत आलेली आपली मोठी परंपरा आहे. योगामुळे आरोग्य चांगले राहून मनशांती मिळते. प्रत्येकाने योगासने रोज करुन आपल्या जीवनात योगाला अविभाज्य घटक बनवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केले.

मंत्री श्री.भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.सुरुवातीला मंत्री श्री. भोसले यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन योग दिनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक आदी उपस्थित होते.

रोज योगासने केल्यामुळे मनशांती बरोबर आरोग्यही चांगले राहते. हजारो वर्षांपासून परंपरा या योगाला आहे. योगासनांमुळे अनेक व्याधी बऱ्या होत आहेत. रोज योगासने करुन आपले जीवन योगामय करा, असे आवाहन करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

संबंधित पोस्ट

ऐतिहासिक निकाल: पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती! मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश;मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मशास्त्रीय भूमिकेचा विजय

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण…

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीरच्या भद्रवाह – चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta