vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिताजड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी..

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिताजड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी..

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी):- श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दि.05 जून रोजी सायं.4.00 ते दि.06 जून 2026 रोजी रात्रौ 10.00 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडी पर्यत तसेच माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतुक बंदी अधिसूचना जारी केली आहे.

श्री शिवराज्याभिषेक सोहळा-2026 हा कार्यक्रम दि.05 जून व दि.06 जून 2026 रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहॆ. या कार्यक्रमासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई वैगेरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने श्री शिवभक्त हे आपआपली वाहने घेवून येत असतात. तसेच या कार्यक्रमाकरीता आयोजकांच्या सामानाची वाहने देखील मोठ्या प्रमाणात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येत असतात. या सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त हे रायगड किल्ला येथे माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला असे जाण्याचे एकूण तीन मार्ग आहेत. या मार्गावरून शिवभक्त हे आपआपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येत असतात. तसेच शासकीय यंत्रणा यांच्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. सदर शिवभक्तांची वाहने ही मुंबई-गोवा महामार्गावरून कशेडी घाट ते महाड, तसेच वाकणफाटा-नागोठणे-कोलाड-माणगांव-महाड या महामार्गावरून येत असतात. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असते अशावेळी अपघात, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कार्यकमाच्या वेळी कोठे ही वाहतुक कोंडी निर्माण होवू नये व श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी वाहतूक बंदी जाहीर केली आहॆ.

सदरची वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका या वाहनांना लागू राहणार नाही.

या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी दिले आहेत.

000

संबंधित पोस्ट

तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून भाग्यश्री सुतार आत्मनिर्भर

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम !अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्‍बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ समृध्‍द लोकशाहीसाठी आश्‍वासक बाब…

ग्राम महसुल अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळानव्या प्रणालींच्या कार्यपद्धती जाणून घ्या- विभागीय आयुक्त दिलीप गावडे०ग्रामिण भागात लोकांना प्रभावी सेवा द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

vishwatmaklokswamivarta

एका लग्नाची गोष्ट’-अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान