vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा उतसाहात

विधी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा उतसाहात

अमरावती, प्रतिनिधी): जिल्हा व सत्र न्यायालय येथे बुधवार, दि. 22 जुलै रोजी विधी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. सदर कार्यशाळेला 73 नवनियुक्त विधी स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी प्रत्यक्षरित्या, तसेच तालुकास्तरावर नवनियुक्त 207 विधीस्वयंसेवक आभासी पद्धतीने उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उज्वला नंदेश्वर, जिल्हा व सत्र न्यायालय जिल्हा न्यायाधीश ए. जी. जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, तसेच जिल्हा सहकारी वकील परिक्षीत गणोरकर यांचे हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी उज्वला नंदेश्वर यांनी विधी स्वयंसेवक यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये विधी स्वयंसेवक यांना विविध विषयावर प्रमुख वक्ते यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये विधी स्वयंसेवक यांना ॲड. सपना काळे, श्री. विधळे, पॅनल अधिवक्ता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती सखी वन स्टॉप सेंटरच्या समुपदेशिका वर्षा देशमुख, सायबर सेलचे निखील माहुरे, प्रा. रचना पिंपळगावकर, महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्या सुचिता बर्वे, वाहतुक शाखेच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राम्हणे, समुपदेशिका वनिता राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामधील उपमुख्य अधिवक्ता ॲड. अमित सहारकर, पंजाबराव विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

समारोपीय कार्यक्रमात विधी स्वयंसेवक यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

0000000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन आणि विद्यार्थ्यांचा आवाज अभियानाला शहर काँग्रेसची धार महाराष्ट्र राज्य सहप्रभारी रेहाना रियाज चिश्ती यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; युवक-विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ,• ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ• कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आयुष्मान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा – डॉ. ओमप्रकाश शेटे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ अंतर्गत नोंदणी करणेकरिता आवाहन*

उद्योग प्रतिनिधींची बैठक -सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती सादर करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta