vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, प्रतिनिधी :- पुणे येथील नॅन्सी लेक होम प्रकल्पाला 2004 नंतर आतापर्यंत जवळपास 10 वेळा सुधारित मान्यता देण्यात आली असून गाव नकाशा आणि मोजणी नकाशामध्ये सर्व्हे क्र.8 आणि 9 च्या स्थानांमध्ये फेरबदल केले गेल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, पुणे यांनी भूमी अभिलेख विभागासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्थळभेट द्यावी आणि सखोल चौकशी करुन 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन, मुंबई येथे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नॅन्सी लेक होम सर्व्हे नं.8, कात्रज, पुणे येथे विकासकाने बेकायदेशीर बांधकाम प्रकल्प केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

    या प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी, पुणे यांनी बिगरशेती आदेशामध्ये 37,973.20 चौ.मी. क्षेत्रफळासाठी बांधकाम परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात 60,630.59 चौ.मी. क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले आहे किंवा कसे, वारंवार नकाशात बदल करण्याची कारणे काय आहेत, असे प्रश्न या बैठकीप्रसंगी उपस्थित करण्यात आले. याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडून समाधानकारक खुलासा होऊ न शकल्याने सभापती प्रा.राम शिंदे यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना यासंदर्भात स्थळभेट देऊन चौकशी करुन 15 दिवसांच्या आत अहवाल देण्याबाबतचे निर्देश दिले

   याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (4) शिवदर्शन साठ्ये, उप सचिव मोहन काकड, नगरविकास विभागाच्या सह सचिव प्रियांका छापवाले, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका रमेश काकडे, उप अभियंता रुपाली ढगे, सहाय्यक विधि अधिकारी निलेश बडगुजर, नगर भूमापन अधिकारी, बाळासाहेब भोसले उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

यशकथा-बँक सखी ते लखपती दीदींची आधारस्तंभ: कावेरी जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास

महिला व चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल

दादर येथे आंदोलन काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करत कठोर सैन्य कारवाईची मागणी !पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु जनजागृती समिती

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन

पेडगाव येथील ३३ किलोवॅट ऊर्जा रोहित्राचे थाटात लोकार्पण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांनी तर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा कुटुंबीयांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान- ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमातील भावनिक क्षण