vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चिखलदऱ्याची कॉफी राष्ट्रीय पातळीवर नेणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास चिखलदरा ते दिल्लीपर्यंत मार्केट उपलब्ध करू

चिखलदऱ्याची कॉफी राष्ट्रीय पातळीवर नेणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास चिखलदरा ते दिल्लीपर्यंत मार्केट उपलब्ध करू

       अमरावती, प्रतिनिधी: चिखलदरा येथील कॉफीचे संवर्धन व रोजगार निर्मिती उपक्रमाद्वारे पर्यटनाला चालना देण्याचे आश्वासन महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. चिखलदरा हेरिटेज कॉफी उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करून चिखलदऱ्याची कॉफी ही देशपातळीवर नेण्यासाठी, कॉफीचे मार्केटिंग चिखलदरा ते दिल्लीपर्यंत करण्याचा संकल्प पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी केला. निमित्त होते नुकत्याच संपन्न झालेल्या उमेदच्या वैदर्भीय महिला मेळाव्याचे !

        चिखलदरा हे देश पातळीवर पर्यटन केंद्र व्हावे, यासाठी चिखलदरा महोत्सवाला चालना देत असताना आदिवासी महिलांसाठी रोजगार निर्मितीचे विविध उपक्रम राबविण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी वैदर्भीय मेळाव्यामध्ये व्यक्त केला. यावेळी महिलांनी मांडलेल्या विविध स्टॉल्सला त्यांनी भेटी दिल्या, त्या महिलांची संवाद साधत त्यांच्या उद्यमशीलतेचे कौतुक केले. विदर्भात ‘चिखलदरा ‘ या एकमेव ठिकाणी कॉफीचे उत्पादन होत असल्याने कॉफीच्या उत्पादनावर आधारित मूल्यवर्धित उपक्रम येथे राबविण्यात येतील व यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्या जाईल. यासोबतच चिखदरा ते दिल्लीपर्यंत मार्केटिंग करून चिखलदऱ्याची कॉफी राष्ट्रीयपातळीवर नेऊ. यासाठी आवश्यक मार्केट उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

   वैदर्भीय महोत्सवातील बचतगटांच्या स्टॉल्सला भेटी देताना मेळघाटातील चिखलदरा येथील स्फूर्ती क्लस्टर कॉफी स्टॉलच्या उत्पादनाची माहिती जाणून घेतली. येथील कॉफी मेळघाटची विशेष ओळख ठरेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी व्यासपीठावरून चिखलदरा कॉफीला प्रोत्साहित करण्याची घोषणा केली. यावेळी कॉफीद्वारे उत्पादित करण्यात आलेल्या सौंदर्य प्रसाधनाची शृंखला असलेली पेटी मीनाक्षी व भारती भालेराव यांनी व्यासपीठावर येऊन पालकमंत्री श्री.बावनकुळे यांना भेट देवून त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

    केंद्रीय मंत्री सडक परिवहन व राजमार्ग भारत सरकार नितीन गडकरी यांनी चिखलदरा येथील कॉफी उत्पादनाबाबत मूल्यवर्धन प्रकल्प स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून शक्य असल्याबाबत व त्यावर एमगिरी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था, वर्धा यांनी केलेल्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टॅंडर्ड डायजेशनच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रकल्प उभा करणे शक्य असल्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना दिले आहे.

    चिखलदरा कॉफी ही विदर्भातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. चिखलदरा येथे 1820 मध्ये इंग्रजांनी कॉफी लागवडीचा पहिला प्रयोग केला होता. मुल्हेरन कॉटेज या इंग्रज अधिकाऱ्याने केरळमधून कॉफीची रोपे आणली आणि चिखलदऱ्यात लावली. आजही चिखलदरा येथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते आणि ती देशभरात प्रसिद्ध आहे.           चिखलदरा कॉफीचे उत्पादन अरेबिका प्रकारात होते, जे त्याच्या चव आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. चिखलदरा कॉफीची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि ती मुंबई आणि बंगलोर येथेही पाठवली जाते, हे विशेष !

0000000

संबंधित पोस्ट

कुळगाव बदलापूर नक्शा प्रकल्प

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024टपाली मतदानास मतदार सुविधा केंद्रात उत्साहात सुरुवात;कर्तव्यावरील मतदारांनी बजावला 

vishwatmaklokswamivarta

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे 

शैक्षणिक संस्थात हिजाब बंदी योग्यच – कर्नाटक हायकोर्ट

vishwatmaklokswamivarta

मुंबई उच्च न्यायालयाची मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मनाई, मुंबईऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा, असे आदेश

वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक…

vishwatmaklokswamivarta